धोनीचा बाहुबली अवतार!! सरावादरम्यान धमाकेदार खेळीने मुंबईचे टेन्शन वाढलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सिझनला अवघे काही तास शिल्लक असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग मध्ये जोरदार घमासान होणार आहे. या लढती आधी मुंबई इंडियन्स संघाचे टेन्शन वाढले आहे. कारण चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सराव करताना तब्बल 10 सिक्स मारल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

चेन्नई सुपर किंग्जने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सीएसकेने शेअर केलेला हा व्हिडिओ कर्णधार धोनीचा आहे. ४४ सेकंदाच्या या व्हिडियोमध्ये धोनीचा बाहुबली अवतार दिसत आहे. धोनी एकापाठोपाठ एक असे १० षटकार मारताना दिसतोय. हा व्हिडिओ चेन्नई संघाच्या सराव सामन्यातील आहे

आयपीएल 2021 च्या पूर्वार्धात धोनीने सात सामन्यांत फक्त 37 धावा केल्या. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 14 मध्ये 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने सात पैकी 5 सामने जिंकले. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. रविवारी दोन्ही संघामध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment