Tuesday, June 6, 2023

संतापजनक ! झाडाच्या फांद्या तोडल्या म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये पिपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad) महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. पिंपरीमधील खराळवाडी या ठिकाणी हि घटना घडली आहे. रामेश्वर वाघमारे असे मारहाण करण्यात आलेल्या महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे. मान्सूनपूर्व कामासाठी वीजवाहक तारांना ज्या झाडाच्या फांद्या अडथळा ठरत आहेत त्या तोडण्याचे काम महावितरणचे कर्मचारी करत होते. त्याचवेळी त्यांना ही मारहाण करण्यात आली.

या कर्मचाऱ्यांनी ज्या झाडाच्या फांद्या तोडल्या त्या झाडाची देखभाल संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तीने केली होती. यादरम्यान फांद्या तोडल्याचा त्याला राग अनावर झाल्याने त्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याला काठीने मारहाण केली. याप्रकरणी महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर पिंपरी (pimpri chinchwad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काठीने मारहाण
महावितरणचे कर्मचारी झाडाच्या फांद्या तोडत असताना संबंधित व्यक्तीने एक काठी आणली आणि कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब