मुहूर्त ट्रेडिंग: दिवाळीच्या दिवशी तुम्हाला मिळेल मोठी कमाई करण्याची संधी, मोठ्या नफ्यासाठी काय करावे जाणून घ्या

0
134
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिवाळीचा दिवस शेअर बाजारासाठी खूप खास असतो. यावेळी बाजार बंद असला तरी या दिवशी एक तासासाठी मुहूर्त ट्रेडिंगचे (Muhurat trading session 2021) आयोजन केले जाते. या दरम्यान मार्केटमध्ये फक्त 1 तास ट्रेडिंग होते. या एका तासात गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करून बाजाराची परंपरा पाळतात.

जर तुम्ही पैसे कमावण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या दिवशी तुम्ही पैसे गुंतवू शकता. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. यावेळी दीपावलीच्या दिवशी 4 नोव्हेंबर 2021 रोजी NSE आणि BSE वर संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत मुहूर्त ट्रेडिंग असेल. दोन्ही एक्स्चेंजच्या मते, दिवाळीच्या मुहूर्ताचे ट्रेडिंग हे संध्याकाळी 6:00 ते 6:08 पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सत्र असेल. यानंतर संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग होईल. चला तर मग मुहूर्त ट्रेडिंग बद्दल जाणून घेऊयात …

स्‍पेशल शेअर ट्रेडिंग केले जाते

दिवाळी ही नवीन वर्षाची सुरुवातही असते. यावेळी संवत् 2077 ची सुरुवात दिवाळीने होणार आहे. भारतीय परंपरेनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये दिवाळी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात देखील करते. या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारातील ट्रेडर्स स्‍पेशल शेअर ट्रेडिंग करतात. म्हणूनच याला मुहूर्त ट्रेडिंग असेही म्हणतात.

एका विशिष्ट वेळी होते मुहूर्त ट्रेडिंग 

मुहूर्ताच्या वेळी शेअर बाजारात गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. या एक तासाच्या मुहूर्तावर बहुतांश गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी करतात. मुहूर्ताची खरेदी-विक्रीची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. दरवर्षी मुहूर्त ट्रेडिंगसाठी एक विशिष्ट वेळ निश्चित केली जाते. या शुभ मुहूर्तावर गुंतवणूकदार मूल्यावर आधारित शेअर्सची खरेदी करतात.

काही काळासाठी तेजी येते

बाजारातील जाणकारांच्या मते व्यापारी मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी मोठी गुंतवणूक करतात. परंपरे नुसार ट्रेडर्स बहुतेकदा खरेदीची पहिली ऑर्डर देतात. मागील वर्षांतील या कालावधीतील बाजाराची कामगिरी पाहिली तर बहुतांश प्रसंगी शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी मर्यादेत राहिला आहे. त्याचबरोबर काही काळ बाजारात तेजीही आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here