नवी दिल्ली | स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक काळ सत्ता गाजवणा-या कॉंग्रेसची आता मात्र पुरती दैना झाली आहे.१३४ वर्षाच्या कॉंग्रेस पक्षाला आता आतून गटबाजीने पोखरले आहे. २०१४ मध्ये देशात मोदी लाट आली आणि ती कायम राखत २०१९ मध्येही देशात मोदी सरकार भाग २ हा अध्याय आरंभला आहे. अशात काँग्रेसची अवस्था बिन अध्यक्षाचा पक्ष अशी आहे. त्यामुळे आज या पक्षाला अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला त्यानंतर अवघं एकच वर्ष अध्यक्षपद सांभाळणारे राहुल गांधी यांनी लोकसभेच्या पराभवाची जबाबदरी घेत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावरून पक्षातील अनेक ज्येष्ठांनी, राजकीय जाणकारांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, सारे प्रयत्न फेल ठरले.राहुल गांधी शेवटपर्यंत राजीनाम्यावर ठाम राहिले. गेले ३ महिन्यापासून कॉंग्रेस बिनअध्यक्षाची चालत आहे. त्या कॉंग्रेसला अखेर आज अध्यक्ष मिळणार असल्याचे कळते.
अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीने आज बैठक बोलावली आहे. या बैठकीत कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत मल्लिकार्जून खरगे यांच्यासह महाराष्ट्रातील मुकुल वासनिक यांच्या नावाचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी वेगवेगळ्य़ा नावांची चर्चा सुरू होती. अखेर आज त्याच्यावर निर्णय होणार आहे.कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे जूने नेते मुकूल वासनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुकुल वासनिक हे काँग्रेसचे जुने नेते आहेत. विदर्भातील बुलढाणा व रामटेक मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. युपीए सरकारमध्ये सामाजिक मंत्री आणि काँग्रेस सरचिटणीसपदीही काम केले आहे.काँग्रेसचा राष्ट्रीय दलित चेहरा म्हणून देखील त्यांच्याकडे बघितले जाते. दरम्यान आजच्या बैठकीला पक्षाचे मुख्यमंत्री, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur