Multibagger Stock : 50 पैशांनी सुरू झालेल्या ‘या’ शेअर्सने दिला मल्टीबॅगर रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीमध्ये मोठा नफा मिळवून दिला आहे. अशा शेअर्समध्ये ट्रायडंटचे नाव देखील सामील आहे. गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत ट्रायडंटने गुंतवणूकदारांना अनेक पट नफा मिळवून दिला आहे. 6 जून 2001 रोजी ट्रायडंटच्या एका शेअर्सची किंमत फक्त पन्नास पैसे होती, जी 5 एप्रिल 2002 रोजी 35 पैशांवर आली. मात्र आता हे शेअर्स 36 रुपयांच्या पातळीवर आहेत. जर एखाद्याने त्यावेळी या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ते सुमारे 1.04 कोटी रुपये झाले असते. BSE वर 14 ऑक्टोबर रोजी ट्रायडेंटचे शेअर्स 36.25 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. यानंतर या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत हळूहळू वाढ होत गेली. Multibagger Stock

This Multibagger Stock has given 18 times returns in just two year 50000 turn in 8 lakh rupees FGN News | FGN News

असा आहे विक्रमी उच्चांक

18 जानेवारी 2022 रोजी ट्रायडंटच्या शेअर्सची किंमत 70.90 रुपयांवर होती, जो विक्रमी उच्चांक होता. जर एखाद्याने त्यावेळी आपली गुंतवणूक काढून घेतली असती तर 2002 मध्ये त्याने गुंतवलेल्या एक लाख रुपयांचे मूल्य 2.03 कोटी रुपये झाले असते. अशा रीतीने या शेअर्समध्ये अल्पशी गुंतवणुक करून गुंतवणूकदार करोडपती बनले असते. यानंतर, जागतिक अस्थिरतेमुळे या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सध्या हे शेअर्स 49 टक्क्यांच्या मोठ्या सवलतीवर उपलब्ध आहेत. Multibagger Stock

Trident Share News | Trident Q4 Result 2022 | under 50 rupee Multibagger penny stock - Finvestors

ट्रायडंट कंपनी बाबत जाणून घ्या

बेडशीट आणि टॉवेलची आघाडीची उत्पादक कंपनी असलेली ट्रायडेंट कागद, धागा आणि केमिकल्स बनवण्याचे कामही करते. ट्रायडेंटच्या वेबसाइटवरील माहिती नुसार, हे 100 कोटी डॉलर्सपेक्षा अधिकचे जागतिक समूह आहे, ज्याचा व्यवसाय होम टेक्सटाइल्स, पेपर आणि केमिकल्समध्ये आहे. Multibagger Stock

SIP निवेशक ध्यान दें! बाजार के उतार चढ़ाव में क्या करें, निवेश जारी रखें या Pause कर दें

कंपनीची आर्थिक परिस्थिती

BSE वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ट्रायडंटला चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी कंपनीचा निव्वळ नफा एप्रिल-जून 2022 या तिमाहीत 173.55 कोटी रुपयांवरून 123.80 कोटी रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, या काळात कंपनीचा महसूलही 1,847.14 कोटी रुपयांवरून 1667.07 कोटी रुपयांवर घसरला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :https://www.bseindia.com/stock-share-price/trident-ltd/trident/521064/

हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त