हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या शेअर बाजार चांगलाच तेजीत आहे. याच दरम्यान केमिकल फार्मा कंपन्या देखील चांगली कामगिरी करत आहेत. स्पेशियलिटी केमिकल कंपनी असलेल्या ज्योती रेजिन्स अँड एडेसिव्ह लिमिटेडचे शेअर्स देखील गेल्या 5 दिवसांपासून सातत्याने वर चढत आहेत. बुधवार (14 सप्टेंबर रोजी) कंपनीच्या शेअर्सनी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये अप्पर सर्किट गाठले. यादरम्यान BSE वर हे शेअर्स 5 टक्क्यांनी वाढून 1,769.70 रुपयांच्या पातळीवर पोहोचले.
सलग 5 दिवसांच्या अप्पर सर्किटमुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही बातमी लिहेपर्यंत BSE वर ज्योती रेजिन्सचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह सुमारे 1753 रुपयांच्या भावाने ट्रेड करत होते. Multibagger Stock
1 महिन्यात दिला 80 टक्के रिटर्न
ज्योती रेझिन्सने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना सुमारे 80 टक्के रिटर्न दिला आहे. फक्त 5 आठवड्यांतच 105 टक्के रिटर्न देऊन कंपनीने गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 380 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच गेल्या एका वर्षात त्याने गुंतवणूकदारांना 525 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
जर एखाद्याने या वर्षाच्या सुरुवातीला ज्योती रेझिन्सच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 4.70 लाख रुपये झाले असते. त्याचवेळी, वर्षभरापूर्वी या कंपनीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत सुमारे 6.26 लाख रुपयांनी वाढली असती. Multibagger Stock
पाच आठवड्यांत मिळाले 2 लाख
गेल्या पाच आठवड्यांमध्ये या कंपनीने ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यानुसार त्यामध्ये गुंतवलेल्या पैशांचे मूल्य आज दुप्पट झाले आहे. म्हणजेच जर एखाद्याने 5 आठवड्यांपूर्वी त्यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 2 लाख रुपये मिळाले असतील. Multibagger Stock
भागधारकांना मिळणार मजबूत बोनस
स्मॉल कॅप कंपनी असलेल्या Jyothi Resins & Adhesives Limited ची मार्केट कॅप 2.11 हजार कोटी रुपये आहे. कंपनीने नुकतेच भागधारकांना 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली आहे. तसेच 8 सप्टेंबरपासून हे शेअर्स एक्स-बोनस म्हणून ट्रेड करत आहेत. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/jyoti-resins–adhesives-ltd/jyotires/514448
हे पण वाचा :
iphone वरून अँड्रॉइड फोनवर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरा ‘हे’ Apps
Telegram चे ‘हे’ 5 फीचर्स आहेत खूप उपयोगी, त्याविषयी जाणून घ्या
FD Rates : प्रेशर कुकर बनवणारी ‘या’ कंपनीच्या FD वर मिळते बँकांपेक्षा जास्त व्याज
Post Office च्या योजनेमध्ये फक्त 299 रुपयांमध्ये मिळेल 10 लाखांचा विमा
LIC च्या ‘या’ योजनेत दरमहा 45 रुपये जमा करून मिळवा 25 लाख रुपये