हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : मूलभूतदृष्ट्या मजबूत असलेल्या कंपनीच्या कोणत्याही शेअर्समध्ये दीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक कधीही निष्फळ जात नाही. Vinati Organics च्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते. या शेअर्सने कालावधीसाठी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या 10 वर्षात यामध्ये 3,500 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कंपनी कडून नुकतेच सप्टेंबर 2022 च्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामुळे ब्रोकरेजच्या आवडीत भरच पडली आहे. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा सप्टेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीतील 81 कोटी रुपयांच्या तुलनेत 43 टक्क्यांनी वाढून 116 कोटी रुपये झाला आहे. तसेच निव्वळ विक्री देखील 51 टक्क्यांनी वाढून 566.29 कोटी रुपये झाली आहे, जी मागील वर्षी याच तिमाहीत 374 कोटी रुपये इतकी होती. Multibagger Stock
ब्रोकरेज फर्म असलेल्या शेअरखानने याबाबत म्हटले की,” Vinati Organics चा ATBS/IBB विभागातील प्रमुख जागतिक बाजारपेठेतील हिस्सा, खास प्रोडक्ट पोर्टफोलिओ, क्षमता विस्तार/नवीन उत्पादने लॉन्च करणे आणि स्पेशल रासायनिक विभागातील मोठ्या निर्यात संधी यामुळे ते दोन अंकी कमाई करू शकणारी कंपनी बनवेल. शेअरखानने यासाठी 2,500 रुपयांच्या या टार्गेट प्राईस ठेऊन खरेदीची शिफारस केली आहे. Multibagger Stock
निर्मल बंग यांनीही या शेअर्स साठी खरेदी करण्याचा सल्ला देताना 2,300 रुपयांचे टार्गेट दिले आहे. या फर्मने सांगितले की,” Vinati Organics ही तिच्या कव्हरेज विश्वातील अशा काही मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे ज्यामध्ये मजबूत ट्रॅक रेकॉर्ड, जोरदार प्रोसेस इनोव्हेशन आणि चांगली आर्थिक स्थिती यावर आधारित पुढील 5 वर्षांमध्ये 25 टक्के EBITDA CAGR ची क्षमता आहे. यामुळे नजीकच्या भविष्यात यासाठी मार्जिन प्रोफाइल घट्ट दिसत असली तरी ही कंपनी वाढताना दिसत आहे. Multibagger Stock
जिओजित फायनान्शिअलच्या मते, कंपनीच्या महसूल वाढीचा वेग कायम राहण्याची अपेक्षा आहे. तिच्या प्रमुख उत्पादनांची मागणी, क्षमता विस्तार आणि नवीन उत्पादनांचे उच्च योगदान लक्षात घेता, कंपनीची वाढ सुरूच राहील. तसेच फर्मने या शेअर्ससाठी 2,360 रुपयांच्या टार्गेट प्राईसने सावकाश खरेदीचा सल्ला दिला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/vinati-organics-ltd/vinatiorga/524200/
हे पण वाचा :
DCB Bank कडून ‘या’ स्पेशल एफडीवर मिळेल 8.25% व्याज, त्यासाठीच्या अटी जाणून घ्या
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने अवघ्या काही हजारांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
Karur Vysya Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.65% पर्यंत व्याज
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदी घसरली; पहा आजचे दर
PF Account : घरबसल्या PF चे पैसे काढण्याची ऑनलाइन प्रक्रिया समजून घ्या