हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही महिन्यांपासून अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स कंसॉलिडेशन टप्प्यातून जात आहे. गेल्या 5 दिवसांत या शेअर्समध्ये 6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र गेल्या 23 वर्षांत या शेअर्सने सुमारे 13 रुपयांवरून ते 4,000 रुपयांची पातळी गाठली आहे. या दरम्यान त्याने सुमारे 30,000 टक्के रिटर्न दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी अपोलो हॉस्पिटल्सच्या शेअर्सची किंमत 12.73 रुपये होती. जर एखाद्याने त्या वेळी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 3 कोटी रुपये झाली असती. Multibagger Stock
59 हजार कोटी रुपयांची लार्ज कॅप कंपनी
हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेल्या अपोलो हॉस्पिटल्सची मार्केट कॅप अंदाजे 59 हजार कोटी रुपये आहे. ते आशियातील हेल्थकेअर सर्व्हिसेसच्या अग्रगण्य पुरवठादारांपैकी एक आहे. अपोलोची जवळपास सर्वच हेल्थकेअर इकोसिस्टम मध्ये उपस्थिती आहे ज्यामध्ये रुग्णालये, फार्मसी, प्रायमरी केअर आणि डायग्नोस्टिक क्लीनिक्सचा समावेश आहे. अपोलोची 10,000 खाटा असलेली 73 रुग्णालये, 4,500 पेक्षा जास्त फार्मसी, 300 पेक्षा जास्त दवाखाने 1,100 हून जास्त डायग्नोस्टिक सेंटर आणि 200 टेलिमेडिसिन युनिट्स आहेत. Multibagger Stock
उच्चांकापेक्षा 32 टक्क्यांनी खाली
मात्र, गेल्या एका वर्षात अपोलो हॉस्पिटल्सच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 2022 मध्ये तो आतापर्यंत 19 टक्क्यांहून जास्तीचे घसरला आहे. या शेअर्सने 26 नोव्हेंबर 2021 रोजी आपला 52 आठवड्यांचा उच्चांक 5,930.70 रुपये तर 26 मे 2022 रोजी 3,365.90 रुपयांचा नीचांक गाठला. अशाप्रकारे सध्या हे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा 32 टक्क्यांच्या खाली ट्रेड करत आहे. Multibagger Stock
5 वर्षात 278% रिटर्न
अपोलो हॉस्पिटल्स ही एक मल्टीबॅगर कंपनी आहे. जानेवारी 1999 मध्ये या शेअर्सची किंमत सुमारे 13 रुपये होती, जी सप्टेंबर 2017 पर्यंत 1,090.55 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. यानंतरच्या 5 वर्षांत या शेअर्सने सुमारे 278.24 टक्के आणि सुमारे 30.49 टक्के CAGR दराने रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.apollohospitals.com/
हे पण वाचा :
चुकून डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करण्यासाठी वापरा WhatsApp चे ‘हे’ नवीन फीचर !!!
“UPI सर्व्हिससाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही”- अर्थ मंत्रालय
Sovereign Gold Bond द्वारे आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर पहा
Stock Market : येत्या आठवडय़ात ‘हे’ घटक ठरवतील शेअर बाजाराची दिशा !!!