Multibagger Stock : ‘या’ स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्सने 1 वर्षात दिला 200% रिटर्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारातील अनेक छोट्या-मध्यम कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना भरपूर नफा कमावून दिला आहे. रिटर्न आणि डिव्हीडंड देण्याच्या बाबत ते अनेकदा चर्चेतही असतात. यादरम्यान Narmada Gelatines Ltd या स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्स चर्चेत आले आहेत. बीएसईवर गेल्या एका आठवड्यापेक्षा जास्त काळापासून सतत अप्पर सर्किट लागले आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी हे शेअर्स गेल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाले होते. आता या आठवड्यात हे शेअर्स आणखी फोकसमध्ये राहतील कारण कारण आता आर्थिक वर्ष 23 साठी प्रति शेअर 100 च्या स्पेशल डिव्हीडंडची रेकॉर्ड डेट जवळ आली आहे.

DIVIDEND STOCK Rs 100: Narmada Gelatines Dividend Record Date, Payment Date  | Narmada Gelatines Ltd Share Price BSE | Zee Business

हे लक्षात घ्या कि, BSE वर शुक्रवारी Narmada Gelatines Ltd. चे शेअर्स 5% वाढून 566.15 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. जो गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. या स्मॉल कॅप कंपनीची सध्याची मार्केट कॅप सुमारे 342.50 कोटी रुपये इतकी आहे. Multibagger Stock

एका वर्षात दिला 200% पेक्षा जास्त रिटर्न

7 डिसेंबर ते 16 डिसेंबर या दरम्यान या कंपनीच्या शेअर्सने BSE वर 5% ते 10% पर्यंत अप्पर सर्किट मारला आहे. या कालावधीत हे शेअर्स ₹274.45 किंवा 94.08% वाढले आहेत. त्याच वेळी, वर्ष-दर-वर्ष रिटर्नच्या बाबतीत, हा स्टॉक 200% पेक्षा जास्त ROI सह मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे.

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year,  here's how

गेल्या एका वर्षात हे शेअर्स जवळपास 232 टक्क्यांनी वर चढला आहे, ज्यामुळे अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. जर एखाद्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याचे 3.31 लाख रुपये झाले असतील. Multibagger Stock

MULTIBAGGER STOCK 2021: This stock has doubled investors' money in nine  trade sessions | Zee Business

मध्य प्रदेशात 1961 मध्ये सुरू झालेली ही कंपनी भारतात ओसिन आणि जिलेटिनच्या उत्पादनात गुंतलेली आहे. हे लक्षात घ्या कि, Narmada Gelatines Ltd. ने प्रति इक्विटी शेअर 100 रुपये स्पेशल डिव्हीडंडसाठी 19 डिसेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. या कंपनीचा शेअरधारकांना डिव्हिडंड देण्याचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड देखील आहे. FY22 मध्येही कंपनीने एकूण 100% प्रति इक्विटी शेअर 10 रुपयांचा इक्विटी डिव्हिडंड दिला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/narmada-gelatines-ltd/shawgeltin/526739/

हे पण वाचा :
Sovereign Gold Bond : आजपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 252 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या आज झाले बदल, नवीन दर तपासा
OnePlus 10 Pro 5G फोनवर मिळत आहे 10,000 रुपयांची सूट, जाणून घ्या फायदा कसा घ्यावा
सिमकार्डशिवाय Telegram वर साइन अप करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या