हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा नफा दिला आहे. Uno Minda Limited चे शेअर्स देखील असेच आहेत. या शेअर्सने गेल्या 10 वर्षांत गुंतवणूकदारांना 9,100 टक्के रिटर्न मालामाल केले आहे. 2013 मध्ये पाच रुपये किंमत असलेले हे शेअर्स सध्या 450 रुपयांच्या पातळीवर आहेत. हे शेअर्स सध्या आपल्या गेल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून (604 रुपये) 38 टक्क्यांहून खाली घसरले आहेत. मात्र गेल्या पाच दिवसांत यामध्ये 1.88 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मंगळवारीही ते 1.46 टक्क्यांच्या वाढीने 461.80 रुपयांवर ट्रेड करत होता.
‘Buy’ रेटिंग
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आपल्या अलीकडील रिपोर्टमध्ये Uno Minda च्या शेअरची ‘Buy’ रेटिंग दिले आहे. गेल्या एका महिन्यात या शेअर्सच्या किंमती 15 टक्क्यांनी खाली आलेल्या आहेत. यामुळे कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचा असा विश्वास आहे की, अल्पावधीमध्ये ऑटो इंडस्ट्रीजसाठीचे चित्र स्पष्ट होत नाही.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजची अपेक्षा आहे की, यूनो मिंडा टू व्हीलर आणि पॅसेंजर व्हेईकल या दोन्ही विभागातील कमकुवत मागणीच्या ट्रेंडमुळे येत्या काळात आव्हानात्मक राहील. मात्र, FY2024E मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची वाढ चांगली राहण्याची अपेक्षा आहे. Multibagger Stock
ताब्यात घेण्यास मान्यता दिली
कोटक पुढे म्हणाले की,” ही कंपनी ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या विकासात सुधारणा करण्यासाठी योग्य स्थितीत आहे. नुकतेच, Ueno Minda कडूनही घोषणा करण्यात आली की, त्यांच्या बोर्डाने जॉईंट व्हेंचर पार्टनर कोसेई, जपानकडून कोसेई मिंडा एल्युमिनियम कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मधील 81.69 टक्के भागभांडवल आणि कोसेई मिंडा मोल्ड प्रायव्हेट लिमिटेड मधील 49.90 टक्के भागभांडवल विकत घेण्यास मान्यता दिली आहे. Multibagger Stock
कंपनी बाबत जाणून घ्या
शेअर्सच्या या अदलाबदलीद्वारे युनो मिंडा लिमिटेडमध्ये विलीनीकरणाच्या कंपोझिट स्कीमद्वारे अधिग्रहणाची योजना आहे. व्यवहाराच्या उद्देशासाठी KMA आणि KMM चे एंटरप्राइझ मूल्य अनुक्रमे 60 कोटी रुपये आणि 11 कोटी रुपये आहे. Uno Minda Limited ही ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्स आणि सिस्टीमची जागतिक पुरवठादार आहे. या कंपनीकडून भारत, आशिया, युरोप तसेच दक्षिण आणि उत्तर अमेरिकेमध्ये 20 पेक्षा जास्त श्रेणीतील ऑटोमोटिव्ह कंपोनंन्ट आणि सिस्टीमचे उत्पादन तसेच पुरवठा केला जातो. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.unominda.com/
हे पण वाचा :
Amazon Prime मेंबरशिपवर मिळवा 50% सूट, कसे ते जाणून घ्या
Earth : पृथ्वीचा शेवट कसा होईल ??? अखेर शास्त्रज्ञांनी शोधून काढले उत्तर
EPFO च्या सदस्यांसाठी खुशखबर !!! सरकारने PF वरील व्याजदरात केली वाढ
सरकार वाढवू शकते PAN-Aadhar Linking ची अंतिम मुदत, द्यावी लागणार लेट फीस
Banking Crisis : अमेरिकेतील बँकिंग संकट आता युरोपच्या उंबरठ्यावर, ‘ही’ दिग्गज बँक बुडण्याच्या मार्गावर