हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PAN-Aadhar Linking : केंद्र सरकारकडून पॅन कार्ड आधारशी जोडण्याची मुदत दोन-तीन महिन्यांनी वाढवली जाऊ शकते.अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्स मधील बातमीनुसार, एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, CBDT कडून याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाईल.
मात्र, या कालावधीसाठी नागरिकांना शुल्क भरावे लागणार आहे. हे लक्षात घ्या कि, सध्या पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. त्यानंतर आधारशी पॅन लिंक न केल्यास 1 एप्रिल 2023 पासून आपले पॅन कार्ड इनव्हॅलिड होईल. याआधी CBDT ने 30 मार्च 2022 ची अंतिम मुदत एका वर्षाने वाढवली होती. त्यानंतर 1 एप्रिल 2022 पासून तीन महिन्यांसाठी 500 रुपये आणि त्यानंतर 1000 रुपये शुल्क निश्चित केले होते. PAN-Aadhar Linking
CBDT ने याबाबत माहिती देताना म्हटले होते की,” 31 मार्च 2023 नंतर, जे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाहीत ते निष्क्रिय होतील. त्यानंतर इन्कम टॅक्सच्या कायद्यांतर्गत पॅन न देणे, माहिती देणे किंवा वितरण न केल्याचे सर्व परिणाम अशा करदात्यांना भोगावे लागतील. PAN-Aadhar Linking
हे लक्षात घ्या कि, याआधीही सरकारकडून पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत चार वेळा वाढवण्यात आली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी तसेच नवीन पॅन मिळवण्यासाठी आधार डिटेल्स देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ऑनलाइन द्वारे लिंकिंग
इन्कम टॅक्स ई-फायलिंग वेबसाइट http://www.incometaxindiaefiling.gov.in वर जाऊन पॅन ऑनलाइन आधारशी लिंक करता येईल.
एसएमएस द्वारे लिंकिंग
खाली दिलेल्या फॉरमॅटमध्ये 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवून पॅन कार्ड आधारशी लिंक करता येईल.
UIDPN <space> <12-अंकी आधार क्रमांक> <space> <10-अंकी पॅन नंबर>.
ऑफलाइन लिंकिंग
जवळच्या पॅन सेवा केंद्र किंवा आधार सेवा केंद्राला भेट देऊन पॅन ऑफलाइन आधारशी लिंक करता येईल. PAN-Aadhar Linking
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर