हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टिबॅगर म्हणून उदयास आले आहेत. शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या फिलाटेक्स फॅशन्स या मोजे बनवणाऱ्या कंपनीचा देखील यामध्ये समावेश होतो. हे लक्षात घ्या कि, अवघ्या एक वर्षामध्ये साडेतीन पट जास्त रिटर्न या शेअर्सची गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला आहे. सध्या यामध्ये जोरदार खरेदी सुरु असल्यामुळे हे शेअर्स आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर आहेत. BSE वर 4 नोव्हेंबर रोजी हे शेअर्स 3.47 टक्क्यांनी वाढून 17.90 रुपयांवर बंद झाले होते, जी मे 2015 नंतरची सर्वोच्च पातळी आहे.
नोव्हेंबर 2021 पर्यंत Philatex Fashions च्या शेअर्सची किंमत 3.86 रुपये होती. मात्र, त्यानंतर हळूहळू त्यामध्ये जोरदार खरेदी होऊ लागली. यामुळे 19 सप्टेंबर 2022 रोजी शेअर्सची किंमत 6.90 रुपये झाली. मात्र, त्यानंतर यामध्ये मोठी वाढ होऊन 4 नोव्हेंबर रोजी ते 18 रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. Multibagger Stock
एका वर्षात दिला 370% रिटर्न
या शेअर्समध्ये जर एखाद्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्यामध्ये 370 टक्क्यांनी वाढ होऊन त्याचे 4.70 लाख रुपये झाले असते. हा उच्चांक गाठल्यानंतर प्रॉफिट बुकींगमुळे या शेअर्सच्या किंमतीत थोडी नरमाई येऊन ते 17.90 रुपयांवर बंद झाले. Multibagger Stock
कंपनी बाबत जाणून घ्या
Filatex Fashions ही कंपनी मुख्यत्वे सॉक्स बनवते आणि कापूस उत्पादनांशी संबंधित व्यवसाय करते. तसेच बाजारात टस्कनी, स्मार्ट मॅन, रेनजॉन आणि बेला या ब्रँड नावाने कंपनीची उत्पादने विकली जातात. या कंपनीचा कारखाना तेलंगणातील मेडक जिल्ह्यामध्ये आहे. तसेच, मॅक्सवेल (व्हीआयपी ग्रुप), फिला इंडिया, आदिदास, पार्क अव्हेन्यू आणि टॉमी हिलफिगर यासारखे मोठे ब्रँड देखील या कंपनीचे ग्राहक आहेत.
जर कंपनीच्या आर्थिक डेटावर एक नजर टाकली तर चालू आर्थिक वर्षाची पहिली तिमाही कंपनीसाठी चांगली ठरलेली नाही. एप्रिल-जून 2022 मध्ये कंपनीला फक्त 4 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला होता तर यापूर्वी जानेवारी-मार्चमध्ये नफ्याचा हा आकडा 2.52 कोटी रुपये होता. या कालावधीतील महसूल देखील जून 2022 च्या तिमाहीत 66.23 कोटी रुपयांवरून 37.98 कोटी रुपयांवर घसरला. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/filatex-fashions-ltd/filatfash/532022/
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा