Multibagger Stock : तोट्यात असूनही टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या शेअर बाजार तेजीत असल्याचे पहायला मिळते आहे. ज्याचा परिणाम टाटा ग्रुपच्या शेअर्सवरही दिसून येतो आहे. यावेळी टाटा ग्रुपची लिस्टेड कंपनी असलेल्या टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येते आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी (शुक्रवारी) टाटा स्टीलचे शेअर्स 2.20% वाढून 106.95 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये एका टप्प्यावर या शेअर्सने 107.40 रुपयांची पातळी देखील गाठली होती. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टीलच्या शेअर्सने गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 138.63 रुपये गाठला होता. तसेच 23 जून 2022 रोजी हे शेअर्स गेल्या 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 82.71 रुपयांवर पोहोचला होता. Multibagger Stock

Tata Steel's deliveries fell 3% in Q3FY22; production grew 2%

हे लक्षात घ्या कि, गेल्या डिसेंबरच्या तिमाहीमध्ये टाटा स्टीलला सुमारे 2502 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तसेच याच तिमाहीत एका वर्षापूर्वी कंपनीने 9598.16 कोटी रुपयांचा निव्वळ नफा देखील कमावला होता. टाटा स्टीलच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या नफ्यात झालेली ही घसरण खर्चात वाढ झाल्यामुळे झाली आहे. मात्र या कंपनीच्या गुंतवणूकदारांना अजूनही आशा आहे की, हे शेअर्स लवकरच पुन्हा वरच्या पातळीवर पोहोचू शकतील. Multibagger Stock

Money order: 4 key reasons why India is still stuck with costly and slow  payment modes like money order - The Economic Times

शुक्रवारी, सकाळी हे शेअर्स 106 रुपयांवर उघडले. तेव्हापासून त्यामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. यावेळी हे शेअर्स 2 टक्क्यांहून जास्तीच्या वाढीने 107.45 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. तसेच गुंतवणूकदारांना यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याआधी आपण एकदा आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करणे योग्य ठरेल. असे न केल्यास आपल्याला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. Multibagger Stock

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www1.nseindia.com/live_market/dynaContent/live_watch/get_quote/GetQuote.jsp?symbol=TATASTEEL

हे पण वाचा :
सेबीच्या बंदीनंतर अभिनेता Arshad Warsi चे स्पष्टीकरण, ट्विटरवर लोकांना केले आवाहन
लवकरच मुंबई-गोवा मार्गावरही धावणार Vande Bharat Train, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
Yes Bank चे गुंतवणूकदार गोंधळात, 3 वर्षांनंतर पुन्हा पाहावे लागणार तेच दिवस ???
Amazon चा जबरदस्त डिस्काउंट !!! 20 हजारांपेक्षा कमी किंमतींत मिळवा 95 हजारांचा ‘हा’ स्मार्टफोन
Gold Hallmarking : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी !!! 1 एप्रिलपासून लागू होणार मोठा बदल