हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण आहे. ज्यामुळे गेले काही दिवस भारतीय बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. मात्र, असे असूनही काही कंपन्या सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा देत आहेत. यामध्ये ऑटो क्षेत्रातील Ashok Leyland या कंपनीचे देखील नाव सामील आहे. गेल्या अडीच वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांच्या भांडवलात तीन पटीने वाढ केली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यामध्ये विक्रीचा दबाव दिसून येतो आहे. मात्र येत्या काळात यामध्ये आणखी तेजीचा कल येणार असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.
43,851.06 कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या या कंपनीचे शेअर्स BSE वर 2 नोव्हेंबर रोजी 149.35 रुपयांच्या किंमतीवर बंद झाले. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी यामध्ये गुंतवणुकीसाठी 185 रुपयांचे टार्गेट निश्चित केले आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा ही 24 टक्के वाढ आहे. Multibagger Stock
तज्ञांचे मत जाणून घ्या
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या विश्लेषकांच्या मते, Ashok Leyland चे कॉस्ट स्ट्रक्चर चांगले आहे. याशिवाय ट्रकच्या वोलन्ट्री स्क्रॅपिंगमुळे व्यावसायिक वाहनांची मागणी वाढेल, ज्याचा फायदा Ashok Leyland ला होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत, ब्रोकरेज कंपन्या याकडे गुंतवणुकीसाठी एक चांगला स्टॉक म्हणून पाहत आहेत. यासाठी त्यांनी 185 रुपयांच्या टार्गेटवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. Multibagger Stock
सवलतीत उपलब्ध आहेत कंपनीचे शेअर्स
या वर्षी 8 मार्च 2022 रोजी या शेअर्सची किंमत 93.20 रुपये होती. मात्र, आता यानंतर यामध्ये खरेदीचा कल दिसून आला आहे. ज्यामुळे 6 सप्टेंबर 2022 पर्यंत 82 टक्क्यांच्या वाढीसह तो 169.40 रुपयांवर पोहोचला. हे लक्षात घ्या कि, हा गेल्या 52 आठवड्यांतील कंपनीचा उच्चांक आहे. यानंतर, यामधील तेजीचा ट्रेंड थांबला आणि तो आता 149.35 रुपयांवर आहे, जो एका वर्षाच्या विक्रमी उच्चांकावरून 12 टक्के खाली आला आहे. Multibagger Stock
कंपनी बाबत जाणून घ्या
Ashok Leyland ही भारतातील दुसरी सर्वात मोठी व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करणारी कंपनी आहे. जिचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. या कंपनीची स्थापना 1948 मध्ये रघुनंदन सरन यांनी केली होती. Ashok Leyland ही बस बनवणारी जगातील चौथी सर्वात मोठी कंपनी आहे तसेच ट्रक्सच्या निर्मितीमध्ये जगातील टॉप 16 कंपन्यांपैकी एक आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/ashok-leyland-ltd/ashokley/500477/
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा