मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत एका 16 वर्षीय मुलीनं भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादानंतर टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या 16 वर्षीय मुलीचा आपल्या भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन वाद झाला होता. यानंतर तिनं रागाच्या भरात उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी रात्री मृत मुलगी आणि तिच्या भावामध्ये मोबाईलवर गेम खेळण्यावरुन वाद झाला होता.
A 16-year-old girl consumed poison and died following a spat with her brother over playing video game on the phone. The girl was short-tempered, she died during treatment. The family could afford only one phone: Sub-inspector Santosh Kharde, Samta Nagar PS, Mumbai#Maharashtra pic.twitter.com/sSBqRnq5X1
— ANI (@ANI) September 12, 2021
भावानं मोबाईल न दिल्याचा राग मुलीला सहन न झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. यानंतर कुटुंबीयांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली असून मृत मुलीचा तिच्या लहान भावासोबत मोबाईलवर गेम खेळण्यावरुन वाद झाला होता.
या रागाच्या भरात मुलीनं जवळच असलेल्या मेडिकल स्टोअरमधून उंदीर मारण्याचं औषध आणलं आणि लहान भावासमोरचं प्यायली. तिनं औषध पिताच भावानं आपल्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.समता नगरचे पोलीस उपनिरीक्षक संतोष खराडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.