हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नांची दुनिया आहे. आणि या स्वप्नाच्या दुनियेत एकाच दिवशी एका रात्रीतून स्टार झालेले अनेकजण आपण पाहिले आहेत. तसेच काहीस यावेळी झालं आहे. यावेळी स्टार झालेली कोणी व्यक्ती नसून ते मुंबई विमानातळ (Mumbai Airport) आहे. होय, मुंबई विमानतळाने एकाच दिवशी तब्बल 1302 उड्डाणे भरली त्यामुळे 2018 साली केलेला रेकॉर्ड मोडला गेला.
दिवाळीच्या पुर्वसंध्येला केला विक्रम
11 नोव्हेंबरला दिवाळीच्या पुर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने एका दिवसात 1302 उड्डाणे भरली. 11 ते 13 नोव्हेंबर या दिवाळी वीकेंड दरम्यान, CSMIA ला प्रवासी वाहतुकीत वाढ झाली. त्यामुळे एकूण प्रवासी संख्या ही तब्बल 516,562 वर पोहचली. या वाढीमुळे विमानतळाने नवा विक्रम केला आहे. या वाढीचे संपूर्ण श्रेय दिवाळीच्या शुभ मुहूर्ताला जाते.
देशांतर्गत 354,541 तर आंतरराष्ट्रीय 162,021 उड्डाणे
11 ते 13 नोव्हेंबरच्या दरम्यान एकूण 516,562 एवढी प्रवासी संख्या होती. यामध्ये एकूण प्रवाश्यांपैकी 354,541 प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला, तर 162,021 प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला. सीएसएमआयएने या कालावधीत एकूण 2,894 हवाई वाहतुकीची सोय केली होती. ज्यात 2,137 देशांतर्गत उड्डाणे आणि 757 आंतरराष्ट्रीय उड्डाणे समाविष्ट आहेत.
कोणती ठिकाणे होती आघाडीवर?
मुंबई विमानतळावरून अनेक ठिकाणी विमान जातात. त्यातील या नव्या रेकॉर्डला सहाय्य करणारी ठिकाणे म्हणजे देशांतर्गत प्रवाशांसाठी दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नई ही प्रमुख ठिकाणे होती. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई, लंडन, अबू धाबी आणि सिंगापूर या यादीत आघाडीवर आहेत.
2018 चा मोडला रेकॉर्ड
9 डिसेंबर 2018 साली मुंबई विमानतळात एका दिवसात 1004 उड्डाणे घेतली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर हा रेकॉर्ड मोडला गेला आहे. त्यामुळे येथे प्रवाश्यांची रिघ वाढताना दिसून येत आहे. 2023 मध्ये प्रवासी वाहतूक संख्या ही तब्बल 33 टक्क्यांनी वाढली असून 12.9 दशलक्ष एवढी झाली आहे. जी मागच्यावर्षी याचवेळी 9.6 दशलक्ष एवढी होती.