हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) राज्यातील आणि देशातील सर्वात महत्वाचे आणि व्यस्त विमानतळपैक्की एक आहे. या विमानतळवरून 900 पेक्षा अधिक विमाने रोज उड्डाण घेतात . परतू आज मात्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळ आज मंगळवारी ( 17 ऑक्टोबर ) 6 तास बंद असणार आहे.
11 ते 5 वेळेत विमानतळ बंद : (Mumbai Airport)
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ मंगळवारी सकाळी 11:00 am पासून ते सायंकाळी 5:00 pm पर्यंत बंद करण्यात येणार आहे. पावसाळा संपल्यानंतर विमानातळावरील रनवे च्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पुढील काही तास मुंबई विमानतळ बंद करण्यात येणार आहे. दुरुस्ती आणि देखभालीच्या कामा अंतर्गत मुंबई विमानतळावरील RWY 09/27 आणि RWY 14/32 या दोन्ही रनवे ची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
6 महिन्यापूर्वीच एअरलाईन्स संबंधितांना अधिकृत नोटीस:
अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार विमानतळच्या 6 तासाच्या बंद संदर्भात मागील 6 महिन्यापूर्वीच एअरलाईन्स संबंधितांना अधिकृत नोटीस देऊन कळवण्यात आले होते. त्यानुसार सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्यांना याबद्दल कल्पना आहे. यामुळे प्रवाश्यांची होणारी अडचण याआधीच दूर करण्यात आली आहे. रनवेची दुरुस्ती आणि देखभाल करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा देण्यासाठी मुंबई विमानतळाला सज्ज करण्यात येणार आहे. यातून प्रवाश्यांची सुरक्षितता देखील राखली जाणार आहे.
मुंबई विमानतळावरून दररोज 900 उड्डाणे:
मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport) दररोज 900 उड्डाणे उडतात. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतरचं मुंबई विमानतळ हे दुसरं सर्वाधिक विमानसेवा देणारं विमानतळ आहे. मागील तिमाहीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 1.27 करोड प्रवाश्यांनी प्रवास केला आहे. जो की याआधी पेक्षा 33% जास्त आहे. मात्र 6 तास विमानतळ बंद असल्यामुळे अनेक प्रवाश्यांची गैरसोय होणार आहे.