2050 पर्यंत मुंबईसह देशातील ‘हे’ प्रसिद्ध शहर पाण्याखाली जाणार; नव्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 30 वर्षांत म्हणजे 2050 पर्यंत भारतातील दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार असल्याचा मोठा दावा ‘क्लायमेट सेंट्रल’ या अमेरिकन संस्थेने 2019 च्या अहवालात नमूद केला आहे. ‘क्लायमेट सेंट्रल’ च्या संकेतस्थळावर हवामान तज्ज्ञांनी क्लायमेट चेंजबाबत हा दावा केला आहे. बुडणारी ही 2 शहरे म्हणजे मुंबई आणि कोलकाता होय. गेल्या दशकातील हवामान बदलाचा परिणाम म्हणून जगात मोठी घडामोड होणार असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रभावाने जगातील वातावरणात अनपेक्षित बदल झाला असून शहरे व समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ याबाबत हा दावा केला जात आहे.

मुंबई आणि कोलकाता शहराला पुराचा धोका

क्लायमेट सेंट्रल ही आंतरराष्ट्रीय अमेरिकन संस्था दरवर्षी हवामान बदल विषयक घडामोडींवर अभ्यास करते. या संस्थेच्या 2019 मधील अभ्यासानुसार, क्लायमेट चेंजबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यात येत्या 30 वर्षांत म्हणजे 2050 मध्ये निसर्गात अनेक मोठे बदल होणार असल्याचा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. क्लायमेट सेंट्रलच्या अंदाजानुसार, भारतातील मुंबई आणि कोलकाता ही दोन मोठी शहरे समुद्रात बुडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान बदलामुळे या शहरांत पूर, समुद्रातील पाण्याची पातळी वाढणे असे बदल घडणार असल्याचा निष्कर्ष काढला आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे पृथ्वीवरील तापमानात अनपेक्षित बदल झाले आहेत. थंड परिसरातील हिमनद्या वितळत आहेत. त्याचा परिणाम होऊन मान्सूनचे वेळापत्रक बदलत आहे. हे वेळापत्रक बदलल्याने पृथ्वीवर पूर, अतिवृष्टी, दुष्काळ पडत आहे. हवामान बदलामुळे भारतातील मुंबई आणि कोलकाता ही शहरे 2050 पर्यंत पाण्यात बुडणार असल्याचा संशोधक करीत आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाचा परिणाम मुंबई आणि कोलकाता या किनारपट्टीलगत शहरांवर होत असून तेथील नागरिकांना पुराचा धोका संभवणार आहे.

मुंबई, कोलकातासह भारतातील या शहरांना होणार पुराचा धोका

मुंबई आणि कोलकातासह इतर काही शहरांना सुद्धा हा धोका असल्याची भीती व्यक्त होत आहे. सुमद्र किनाऱ्यावरील सुरत, ओडिशा, केरळ, तामिळनाडू या शहरांना समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पूर येण्याचा धोका व्यक्त होत आहे. 2050 पर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल आणि 10 देशांची लोकसंख्या प्रभावित होण्याची भीती आहे. वातावरणातील बदलामुळे प्रभावित होणाऱ्या देशांच्या यादीत भारत अग्रस्थानी आहे. वातावरणातील बदलामुळे जगातील कोट्यावधी लोक बेघर होण्याची भीती क्लायमेट सेंट्रलच्या अहवालातून उघड झाली आहे.

हवामान बदलामुळे बुडालेली 5 शहरे

हवामान बदलाचा परिणाम होऊन आजतागायत जगातील पाच शहरे समुद्राच्या पाण्यात बुडाल्याचे वास्तव क्लायमेट सेन्ट्रलने उघड केले आहे. विशेष म्हणजे या शहरांमध्ये मोठी लोकसंख्या होती. या बुडालेल्या शहरांमध्ये इजिप्तमधील थॉनिस हेराक्लियन, इटलीचे बाया शहर, इंग्लंडमधील डरवेंट गाव, जमैकाचे पोर्ट रॉयल आणि अर्जेंटिनामधील विला अपेक्युएन क्षेत्र या शहरांचा समावेश आहे.