मुंबईच्या सेंट्रल बस स्थानकाचा होणार कायापालट; कोणती कामे केली जाणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी. जिथे लाखो लोक स्वप्न पूर्ण करण्यासाठी जातात. त्यामुळे येथून इतर ठिकाणी ये – जा करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे येथे असलेल्या सेंट्रल बस स्टॅन्डचे नूतनीकरण करण्याची चर्चा होती. त्यामुळे या स्थानकाचा कायापालट करण्यासाठी या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुंबईच्या सेंट्रल बस स्थानकाचे नूतनीकरण हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत हा विकास करण्यात येणार असून हे स्थानक नवीन वर्षात प्रवाश्यांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.

किती येणार खर्च?

या सेंट्रल बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी तब्बल दीड कोटी पेक्षा जास्त खर्च आहे. यामधील विशेष बाब म्हणजे ही रक्कम भायखळा मतदारसंघाच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या आमदार निधीतून जिल्हा विकास मंडळाच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात मुंबईकरांना नवीन बस स्थानक मिळणार आहे.

कोणती होणार कामे?

मुंबई सेंट्रल बस स्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी येथे प्रवाश्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रवेशव्दाराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराजवळ बाग-बगिचा विकसित केला जाणार आहे. ज्यामुळे प्रवाश्यांचा प्रवासाचा शिन जाईल अशी अशा आहे. बस स्थानकातील संरक्षण भिंतीवर विविध चित्रांचे रेखाटनकेले जाणार आहे. आणि संगणकीय आरक्षण केंद्राची दुरूस्ती करण्यात येणार आहे. या नवीन कामामुळे सेंट्रल बस स्थानकाचे रुपडे पालटणार आहे.

1 हजार बस फेऱ्यांच्या माध्यमातून 10 हजारपेक्षा अधिक प्रवासी करतात प्रवास

मुंबई सेंट्रल बस स्थानकाची निर्मिती ही 1964 साली करण्यात आली होती. कोकण, खान्देश तसेच पश्चिम महाराष्ट्र येथून मुंबईत येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात आपल्या गावी जाण्यासाठी हे स्थानक लोकांना सोयीचे पडते. त्यामुळे दररोज सुमारे 1 हजार बसफेऱ्यांच्या माध्यमातून तब्बल 10 हजारपेक्षा जास्त प्रवाशांचा चढउतार या बसस्थानकातून होत असतो.