मुंबईत कोरोनाचा हैदोस; कोरोनाग्रस्तांची संख्या साडे ३ हजाराच्या घरात जाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने आता रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत आणखी वाढ करत आहे. सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळत आहेत. सध्या मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८५७ वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी येत्या ४ दिवसात मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा साडे तीन हजाराच्या घरात जाईल अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या जरी वाढली तरी परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही असा विश्वासही परदेशी यांनी व्यक्त केला आहे. मागील २४ तासात राज्यात करोनाचे १६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या नवीन रुग्णांनंतर राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२९७ वर पोहचली आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली आहे.

नेमकं काय म्हणाले प्रवीण परदेशी?
मुंबईत इतर शहरांपेक्षा कोरोना टेस्ट जास्त संख्येत होत असल्यानं मुंबईत जास्त कोरोनाग्रस्त आढळत आहेत. येत्या ४ दिवसांत मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा ३,५०० पर्यंत पोहोचले आहेत असा अंदाज आयुक्त प्रवीण परदेशी यांनी वर्तवला आहे. १० लाखामागे ३०० जणांना कोरोनाची लागण होतेय असा अंदाज त्यांनी वर्तवला. सध्या मुंबईत १० हजार लोक क्वारंटाईनमध्ये आहेत हा आकडा तिपटीनं वाढू शकतो. म्हणून त्यासाठी मुंबईतील लॉज सज्ज ठेवले असून तेथे नवीन लोकांना क्वारंटाईन केलं जाईल. राज्यातील लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात निर्णय हा मुख्यमंत्री घेतील. मात्र, लॉकडाउनचा कालावधी वाढविल्यास परिस्थिती नियंत्रणात जाण्यास मदत होईल असं परदेशी यांनी म्हटलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”