मुंबई । मुंबई सध्या कोरोनाच्या सावटाखाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग मुंबईची चिंता आणखी वाढवत आहे. आज मुंबईत कोरोनाचे ७९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७७५ झाली आहे. तर आज एकाच दिवसात मुंबईत करोनाची लागण झाल्याने ९ जणांचा बळी गेला आहे. एकूण ६५ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
एकीकडे मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. अशात आता कल्याण डोंबिवलीत करोनाग्रस्तांची संख्या ४३ झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ४३ पैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, संपूर्ण देशात आतापर्यंत ५ हजार ७३४ नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. करोना व्हायरसमुळे देशात १६६ जणांचा मृत्यू झाला असून कालपासून १७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे देशात ४७३ जण करोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”