हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईला स्वप्नाचे शहर म्हणून ओळखले जाते. आणि त्यातील दादर हा मुंबईचा मुख्य भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील लोकांची संख्याही प्रचंड आहे. मुंबईतील मध्यवर्ती स्टेशन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर उभे ठाकते ते फक्त दादर स्टेशन (Dadar Railways Station) . दादर रेल्वे स्टेशनवर तब्बल 15 प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे प्रवास करताना गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. ह्यामुळे नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडतो. त्यासाठी स्थानकात काही बदल करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. काय आहेत हे बदल जाणून घेऊयात.
काय होतील बदल?
दादर स्टेशन हे मध्य आणि पश्चिम रेल्वे अश्या दोन भागात विभागले गेले आहे. तसेच एकूण 15 प्लॅटफॉर्म असल्यामुळे गाडीच्या बाबतीत प्रवाश्यांचा गोंधळ उडतो. त्यासाठी रेल्वेने येथील प्लॅटफॉर्मला नवीन क्रमांक देऊन नागरिकांचा होणारा गोंधळ रोखण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल 9 डिसेंबर पासून लागू केले जाणार आहेत.
पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म व मध्य रेल्वे प्लॅटफॉर्मवर होणार बदल
पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्मला आता 1- 7 असा क्रमांक दिला जाणार आहे. तर मध्यवर्ती प्लॅटफॉर्म्सला पुढील म्हणजे 8-15 असे क्रमांक दिले जाणार आहेत. ह्यामुळे नक्कीच नागरिकांचा होणारा गोंधळ आटोक्यात येऊन त्यांच्या वेळेचीही बचत केली जाईल. अशी आशा व्यक्त करता येते.
यापूर्वी कोणते होते क्रमांक
पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म व मध्य रेल्वे प्लॅटफॉर्मला यापूर्वी सारखेच क्रमांक असल्यामुळे प्रवाश्यांना त्याचा त्रास होत असे. कोणती गाडी कोणत्या ठिकाणी जाणार आहे हे सारख्या क्रमांकांमुळे समजत नसे. त्यामुळे पूर्वीचा पश्चिम प्लॅटफॉर्म क्रमांक हा तोच राहणार असून मध्य रेल्वेवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 8 चे 8 ते 14 असे करण्यात येणार आहे. यामध्ये झालेल्या बदलामुळे प्रवाश्यांना फायदाच होणार आहे.
असे असतील नवीन प्लॅटफॉर्म
प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या रुंदीकरणाचे काम चालू असल्यामुळे तो प्लॅटफॉर्म वगळण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1-8 हा उपनगरीय प्लॅटफॉर्म होईल. प्लॅटफॉर्म क्र. 3 -9, प्लॅटफॉर्म क्र. 4-10, प्लॅटफॉर्म क्र. 5 -11, प्लॅटफॉर्म क्र. 6-12 तसेच सध्याचा दादर टर्मिनस प्लॅटफॉर्म क्र. 7- 13, आणि प्लॅटफॉर्म क्र. 8 -14 मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. ह्या बदलामुळे नागरिकांचा होणारा संभ्रम होणार नाही. व ते त्यांना हव्या त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जाऊ शकतील.