हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी नाशिक येथील निखिल भामरे या विद्यार्थ्यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली असता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले आहे. ट्विट मध्ये कोणाचाही थेट उल्लेख नसताना विद्यार्थ्याला तुरुंगात टाकणे पवारांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीलाही आवडणार नाही अस कोर्टाने म्हंटल आहे.
त्या ट्विट मध्ये कोणाचाही स्पष्ट उल्लेख नाही. अस असताना त्या विद्यार्थ्याला तुरुंगात डांबून तुम्ही शरद पवारांसारख्या पद्मविभूषण मिळवलेल्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलन करत आहात. विद्यार्थ्याला अशा तुरुंगात ठेवले जाते हे शरद पवारांसारख्या एका मोठ्या व्यक्तिमत्वालाही आवडणार नाही. त्या मोठ्या व्यक्तिमत्वाने आपली प्रतिष्ठा गमावू नये असे आम्हाला वाटते अस न्यायमूर्ती शिंदे यांनी म्हंटल.
नेमकं प्रकरण काय??
निखिल भामरे या तरुणाने आपल्या ट्विटर वर शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. बारामतीच्या गांधी साठी बारामतीत नथुराम गोडसे बनवण्याची वेळ आली आहे. अस ट्विट त्याने केलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. अनेकांच्या तक्रारी नंतर 14 मे रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती.