Mumbai Infrastructure : मुंबईतील ‘हा’ पूल आजपासून वाहतुकीस खुला; 30 मिनिटांचा प्रवास वाचणार

Mumbai Infrastructure vikroli bridge
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महारष्ट्र ऑनलाईन Mumbai Infrastructure । विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा 615 मीटरचा पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. तसेच या कामानिमित्त मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन सुद्धा केलं आहे. या नवीन पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी मिटेल आणि प्रवाशांचा वेळ सुद्धा वाचेल.

देवेंद्र फडणविस यांनी ट्विट करत म्हंटल, विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री मार्गापासून पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा 615 मीटरचा पूल (Mumbai Infrastructure) मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! पावसाळ्याच्या कालावधीमध्ये लालबहादूर शास्त्री मार्गावर बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होते, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब विचारात घेता कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय मी, तसेच माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला आहे आणि तसे आदेश सुद्धा दिले आहेत.

मी मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये या कामाचे आदेश दिले होते. 104.77 कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आला. येणाऱ्या काळात पाऊस लक्षात घेता मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून हा पूल शनिवार, दि. 14 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजेपासून वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलिसांना दिले आहेत असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

कसा आहे पूल- Mumbai Infrastructure

दरम्यान, विक्रोळी आरओबी विक्रोळी पश्चिमेकडील एलबीएस मार्गाला विक्रोळी पूर्वेतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेशी जोडेल, ज्यामुळे शहराची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि प्रवासाचा वेळ खूपच कमी होईल.या पुलाची एकूण लांबी ६१५ मीटर आणि रुंदी १२ मीटर आहे. रेल्वेने एकूण ६५५ टन वजनाचे सात खांब बसवले, तर बीएमसीने बांधलेल्या खांबांसाठी २,१४२ टन काँक्रीट ओतण्यात आले. या खांबांची लांबी २५ ते ३० मीटर आहे. एकूण १८ खांब तीन टप्प्यात बांधण्यात आले.