हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Kolhapur Vande Bharat। मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षीय मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेन कधी सुरु होणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत ट्रेन येत्या १५ दिवसात प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्ण होणार आहे . रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले की, ही रेल्वे थेट मुंबईपर्यंत धावेल. लवकरच या नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक जाहीर होईल. तसेच मुंबई- कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसचे ट्रेनचे तिकीट किती असेल याची माहितीही लवकरच समोर येईल.
कोल्हापूर आणि मुंबई हे अंतर मोठं आहे.. संपूर्ण पश्मिच महाराष्ट्र हा रूट व्यापून घेतो.. कोल्हापुरातून मुंबईला कामानिमित्त असणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे. तसेच मुंबईहून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला भेट देण्यासाठी सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. परंतु रेल्वेची म्हणावी तशी खास सुविधा या मार्गावर कार्यरत नव्हती. अखेर आता मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन (Mumbai Kolhapur Vande Bharat) सुरु होणार असून यामुळे पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी आणखी वाढण्यास मदत होईल.
कोणकोणत्या स्थानकांवर थांबा असेल? Mumbai Kolhapur Vande Bharat
छत्रपती शाहू टर्मिनसवरून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत (Mumbai Kolhapur Vande Bharat) ट्रेन धावेल. नव्या वंदे भारत रेल्वेला ८ डबे असणार असून त्यातून 550 प्रवासी प्रवास करू शकतील. मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि मिरज जंक्शन या स्थानकांवर थांबेल. सध्या मुंबईवरून कोल्हापूरला किंवा कोल्हापूरहून मुंबईला जायचं असल्याचं कमीत कमी १० तास लागतात, मात्र नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुळे हेच अंतर अवघ्या ७ तासांत पार होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचेलच, याशिवाय कोल्हापूरकरांना आरामदायी प्रवासाचा आनंदही घेता येईल.
सध्या महाराष्ट्रात 11 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. यात मुंबई – सोलापूर, मुंबई- शिर्डी, मुंबई – जालना, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर, इंदूर ते नागपूर. नागपूर-सिकंदराबाद, कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. आगामी काळात महाराष्ट्रात आणखी काही वंदे भारत ट्रेन धावूं शकतात.




