Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच उभारलं जाणार नवं रेल्वे स्टेशन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local) ही मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी  समजली  जाते. दररोज लाखो- करोडो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरातून लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो. कितीही फास्ट ट्रेन असली तरी या भागातील प्रवाशांची गैरसोय हि होतच आहे. त्यावरच मार्ग काढण्यासाठी आणि मुंबई उपनगरातील लोकांचा मुंबईत येण्याचा प्रवास आणखी  सोपा व्हावा यासाठी अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान नवीन चिखलोली रेल्वेस्थानक उभारण्याची मागणी आता पूर्ण करण्यात आली आहे.

7 km दरम्यान दुसरे एकही रेल्वे स्थानक नसल्यामुळे मागणी :

मुंबई उपनगरातील मोठी लोक वस्ती ही अंबरनाथ आणि बदलापूर या वाढत्या शहरांमध्ये राहत आहे आणि भविष्यात देखील ही शहरे आणखी मोठी होतील. त्यामुळे या भागात  रेल्वेचे जाळे (Mumbai Local) आणखी मजबूत करणे गरजेचे आहे. तसेच बदलापूर ते अंबरनाथ या संपूर्ण 7 किलोमीटर दरम्यान दुसरे एकही रेल्वे स्थानक  नाही. त्यामुळे यामध्ये राहणाऱ्या लोकांची रोजच ओढातान होते. हेच लक्षात घेत बदलापूर ते अंबरनाथ या दरम्यान नवीन रेल्वेस्थानक उभारण्याची  मागणी  होत होती.

चिखलोली येथे नवीन रेल्वे स्थानक उभारणार- Mumbai Local 

बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान रेल्वे स्थानकाची मागणी आता पुर्ण करण्यात आली आहे . बदलापूर ते अंबरनाथ दरम्यान असलेल्या चिखलोली येथे मध्य रेल्वेच्या माध्यमातून नवीन  रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे. कल्याण ते बदलापूरपर्यंत रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका आणि नवीन चिखलोली स्थानकासाठी निविदा काढण्यात आली असल्याने येत्या काही वर्षांत ही दोन्ही महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जेणेकरून या भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासादरम्यान होणारी अडचण  दूर होऊ शकेल . त्यामुळे याभागातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.