व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Mumbai Local : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली; मागील 6 महिन्यात 20 कोटींची दंडात्मक वसुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतीय रेल्वे आणि त्यांनी घेतलेले निर्णय हे चांगलेच चर्चेचा विषय बनत आहेत. आता काही महिन्यांपूर्वी मुंबई रेल्वेने ही असच एक निर्णय घेतला होता. ज्यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुल केला जाण्याचा नियम लागू करण्यात आला होता. त्याच वसुलीची आकडेवारी आता समोर आली आहे. पश्चिम रेल्वेला मागच्या काही महिन्यांपूर्वी विनातिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. त्यासाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा, (Mumbai Local) मेल/एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन्स तसेच हॉलिडे स्पेशल ह्या ट्रेनमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. आणि त्याबाबरोबरच विनातिकीट फिरणाऱ्या प्रवाश्याकडून दंड वसुल केले जाऊ लागले . त्यानुसार मागील ६ महिन्यात तब्बल २० कोटी रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात आले आहेत.

कधी सुरु केली तिकीट तपासणी- Mumbai Local

एप्रिल- सप्टेंबर 2023 मध्ये राबवल्या गेलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत तब्बल 81.18 कोटी रुपयांची पुंजी जमली. ज्यात मुंबई उपनगरातून (Mumbai Local)  20.74 कोटी रुपयांची वसुली झाली होती.  हे सर्व पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली सुरु करण्यात आले होते. रेल्वेच्या वसुलीच्या निर्णयामुळे अनेक प्रवाशांना चाप बसला. मात्र त्यातील काही प्रवासी असे होते ज्यांनी विनातिकीट आपला प्रवास अजूनही सुरूच ठेवत होते. अश्या प्रवाश्यांचा शोध घेत रेल्वेने तब्बल 1.64 लाख लोकांकडून 9.50 कोटी रुपये वसुल केले. तसचे सप्टेंबर महिन्यातही ही आकडेवारी कमी झाली नाही. सप्टेंबर महिन्यात 53,000 हजाराहून अधिक प्रवाश्यांकडून 3.34 कोटी रुपये वसुल केले. पश्चिम रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी केले त्यातुन ही आकडेवारी समोर आली आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत 140% अधिक वसुल केला दंड

शोध मोहीम राबवली जात असताना काही प्रवासी एसी डब्यात सुद्धा विनातिकीट प्रवास करत होते. ह्यांचा शोध घेत, मागच्या सहा महिन्यात 38 हजारहुन अधिक प्रवाश्यांवर दंड आकरण्यात आला आहे. जो गेल्या वर्षीपेक्ष्याचा तुलनेत 140% अधिक आहे . ज्यामध्ये तब्ब्ल 126.13 लाख रुपये वसुल केले गेले.

रेल्वेने केले प्रवाश्यांना आवाहन

जून महिन्यात रेल्वेने नालासोपारा स्टेशनवर 21 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 7 RPF कर्मचारी तैनात केले होते . त्यामध्ये एका दिवसात 495 प्रवाश्यांडकून 1.49 लाख रुपये वसुल केले होते. त्यासाठी अजूनही ही मोहीम राबवली जात आहे. आणि दिवसेंदिवस ही संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे   त्यासाठी मुंबई उपनगर रेल्वेने प्रवाश्यांनी विनातिकीट प्रवास न करता तिकिटासह नियम पाळत प्रवास करावा असे आवाहन केले आहे.