Mumbai Local : मुंबई लोकलचे ‘रूप’ बदलणार; गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान

0
1
mumbai local
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Local : मुंबईतील लोकल प्रवास अधिक सुकर करण्यासाठी मोठा बदल होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की रेल्वेसाठी 23,778 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, जी राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी वापरण्यात येईल. मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

10% लोकल फेऱ्या वाढणार (Mumbai Local)

मिळालेल्या माहितीनुसार सध्या चालू असलेल्या 3,200 लोकल सेवा 3,500 पेक्षा जास्त करण्यात येणार आहेत.ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यासाठी सिग्नलिंग यंत्रणेमध्ये सुधारणा केली जात आहे, त्यामुळे 180 सेकंदाचा हेडवे 150 आणि नंतर 120 सेकंदावर आणला जाणार आहे. यामुळे ट्रेन दरम्यानचा वेळ कमी होऊन गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.

‘वंदे भारत’ धर्तीवरील नव्या लोकल ट्रेन (Mumbai Local)

महत्वाची बाब म्हणजे मुंबईकरांसाठी ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या धर्तीवर अधिक आरामदायी आणि वायुविजन युक्त मुंबई लोकल येणार आहे. यासाठी RDSO ला नव्या लोकलच्या डिझाइनसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना अधिक आकर्षक इझाईन असलेल्या लोकलमहून प्रवास करता येणार असून हा प्रवास अधिक आरामदायी सुद्धा होणार आहे.

महाराष्ट्रातील मोठे रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर

दरम्यान महाराष्ट्रात १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रुपये खर्चाचे ४७ प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहेत. 6,985 किलोमीटर नवीन मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. ‘डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर’सह बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही यात समावेश आहे.

अमृत रेल्वे स्थानके आणि सुरक्षा यंत्रणा (Mumbai Local)

132 अमृत रेल्वे स्थानकांच्या निर्मितीसाठी 5,587 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे रेलवे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. याशिवाय रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वेची ‘कवच’ सुरक्षा प्रणाली 4,339 किमीवर कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्रात रेल्वे मार्गाच्या विकासात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे. 2009-14 या काळात 0 किमी मार्गांचे विद्युतीकरण झाले होते. तर 2014-2025 या काळात दरवर्षी सरासरी 326 किमी विद्युतीकरण करण्यात आले.आता महाराष्ट्रातील 3,586 किमी रेल्वे मार्ग पूर्णपणे विद्युतीकरण (Mumbai Local)
झाले आहे.