मुंबई| गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर सापडू लागल्याने मुंबईत आज मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार असून या काळात ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. ही जमावबंदी असून नवीन लॉकडाऊन नाही, असं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
पोलीस विभागाचे प्रवक्ते आणि पोलीस अधिकारी प्रणय अशोक यांनी हे बंदी आदेश काढले आहेत. मुंबईत आजपासून १५ जुलैपर्यंत रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही जमावबंदी असेल. या जमावबंदीमधून केवळ अत्यावश्यक सेवा, सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना, नागरिकांना यामधून वगळण्यात आले आहे. इतर नागरिकांसाठी ही जमावबंदी असणार आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अशावेळी गर्दी करण्यास किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव आसेल.
धार्मिक स्थळांना काही अटी आणि शर्तींवर संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे, असं ते म्हणाले. मुंबई पोलिसांनी रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या जमावबंदीमधून केवळ अत्यावश्यक सेवा, सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना, नागरिकांना यामधून वगळण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडताना मास्क लावूनच घराबाहेर पडावं, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे.