आपले अनेक महिलांशी संबंध होते त्यामुळे मला किती मुलं आहेत याबाबत माहिती नाही – फुटबॉलपटू पेले यांचे धक्कादायक विधान!

ब्राझिल | पेले म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे, ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू आणि फुटबॉलचा गेम! पेले म्हणजे फुटबॉल विश्वातील एक मोठे आणि ब्रँड असलेले नाव! ब्राझीलला यांनी तीन फुटबॉल विश्वचषक मिळवून दिले. पण या महान खेळाडूने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक माहिती जगाला दिली आहे. ते म्हटले आहेत की, जगभरात त्यांचे अनेक महिलांशी संबंध असल्यामुळे त्यांना एकूण किती मुले असतील याबाबत काहीच माहिती नाही.

पेले यांच्या जीवनातील अनेक पैलू हे एका नेटफ्लिक्सच्या डॉक्युमेंटरीमधून सांगितले गेले आहेत. त्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि विवाह जिवणाबद्दल सहज बोलणी केली आहे. त्यांचा तीन वेळा विवाह होऊनही त्यांचे अनेक महिलांशी संबंध असल्याचे त्यांनी त्यामध्ये नमूद केले आहे. सोबतच त्यांनी या सर्व महीलेपासून त्यांना किती मुले आहेत हे माहीत नसल्याचे म्हटले आहे.

पेले हे जगभरामध्ये आणि ब्राझीलमध्ये फुटबॉल विश्र्वाकरिता एक आदरणीय चेहरा आहेत. त्यांच्या कामगिरीसाठी आणि खेळातील अफलातून चापळायीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी समाजसुधारणा कामामध्ये देशात योगदानही केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव मोठे आहे. सद्ध्या ते 80 वर्षीय असून, त्यांचे 7 मुले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like