रेल्वे ट्रॅक ओलांडणे पडले असते महागात! पोलीसाने वाचवला वृद्धाचा जीव; थरारक प्रसंग CCTVत कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईत फ्लायओव्हरचा वापर न करता रेल्वे ट्रॅक ओलांडणे एका वृद्धाला चांगलेच महागात पडणार होते. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी या वृद्धाने फ्लायओव्हरवरून न जाता थेट रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना या वृद्धाचा पाय अचानक ट्रॅकमध्ये अडकला.

आपला पाय रेल्वे ट्रॅकमधून काढण्याच्या झटापटीत वृद्धाच्या पायातील बूट निघाला. मात्र, तितक्यात त्याच ट्रॅकवर लोकल ट्रेन येत असल्याचे एका पोलीस कॉन्स्टेबलच्या लक्षात आले. पोलीस कॉन्स्टेबलने धावत जाऊन वृद्धाला सचेत केले.

भांबावलेल्या अवस्थेत या वृद्धाने प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयन्त केला. तर दुसरीकडे लोकल ट्रेन वेगात पुढे येत होती. तितक्यात क्षणाचाही विलंब न करता पोलिसा कॉन्स्टेबलने अगदी जिकिरीचे वृद्धाला ट्रॅकवरून वर खेचले. अगदी थोडक्यात या वृद्धांचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना रेल्वे प्लॅटफॉर्मवरीलCCTV त कैद झाली आहे. मात्र, रेल्वे प्लॅटफॉर्म ओलांडताना सूचनांचे पालन न करणे किती जीवावर बेतू शकते हे घटनेवरून दिसून येते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment