खोपोली : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली आहे. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीपासून 40 किमीच्या अंतरावर हा भीषण अपघात (accident) झाला आहे.
या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात (accident) झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा ट्रक डिव्हायडर तोडून मुंबई लेनमध्ये आला. मध्ये असलेल्या स्क्रॅप विखुरला गेला आणि स्क्रॅपचे तुकडे बसमध्ये मारले गेले. बस पूर्णपणे भरलेली होती, यातल्या 15 प्रवाशांना दुखापत झाली आहे. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
ट्रक नंबर MH-40- BG- 3457 चा चालक नावेद खान हा पुण्याहून मुंबईकडे जात होता, तेव्हा अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला. हा ट्रक मुंबई लेनवरून पुणे लेनवर गेला आणि बस नंबर KA-41-D-1471ला जाऊन आपटला आणि हा अपघात झाला. या अपघातात (accident) ट्रकचालक नावेद खान आणि बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत तर बसमधील बाकी 13 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!