हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे ,तर ४ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशने येणाऱ्या अर्टिगा कारला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे गाडी रस्त्याकडेला जाऊन पडली आणि दरवाजा तुटल्याने प्रवासी बाहेर पडले. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात ५ जणांना आपले प्राण गमवावे लागले.
अब्दुल रहमान खान (वय 32) राहणार घाटकोपर, अनिल सानप, वसीम साजिद काझी, रा. राजापूर, राहुल कुमार पांडे, (वय 30) राहणार कामोठे, आशुतोष गांडेकर (वय 23) राहणार अंधेरी मुंबई अशी मृतांची नाव आहेत. तर मच्छिंद्र आंबोरे वय 38 वर्ष (चालक), अमीरउल्ला चौधरी, दिपक खैराल, अस्फीया रईस चौधरी, 25 वर्षे. कुर्ला, मुंबई अशी जखमींची नावे आहेत.




