Mumbai Pune Expressway वरील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Mumbai Pune Expressway महाराष्ट्राच्या विकासासाठीचा आर्थिक कणा समजला जातो. या एक्सप्रेस वे मुळे पुणे आणि मुंबई मधील प्रवासाचे अंतर कमी झाले खरे परंतु दिवसेंदिवस एक्सप्रेस वे वरील वाहनांची संख्या वाढत आहे. एक्सप्रेस वे बनवण्यात आला तेव्हा साठ हजार वाहने दर दिवशी प्रवास करतील या दृष्टीकोनातून बनवण्यात आला होता. परंतु सध्यस्थितीत एक्सप्रेसवे वरून 1 लाख पेक्षा अधिक वाहने प्रवास करत आहेत. त्यामुळे एक्सप्रेसवे देखील सततची वाहतूककोंडी निर्माण होत असते . तसेच भविष्यात नवी मुंबई येथे होत असलेल्या नव्या अंतरराष्ट्रीय विमानतळा मुळे देखील मुंबई -पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक भरमसाठ वाढेल .हे लक्षात घेत शासनाने एक्सप्रेसवे रुंदीकरांनाचा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले.

MSRDC च्या माध्यमातून बनवला जात आहे रस्ता

सध्या असलेल्या सहा पदरी एक्सप्रेसवेची (Mumbai Pune Expressway) रुंदी वाढवून तो आठ पदरी पर्यंत वाढवण्यात येणार आहे.त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पातळीवर सरकार काम करत असून रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असणारा DPR ( Detailed project report )महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या ( MSRDC ) माध्यमातून बनवला जात आहे.

2500 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित- Mumbai Pune Expressway

साधारणपणे मुंबई – पुणे एक्सप्रेसवेच्या रुंदीकरणासाठी 2500 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या DPR वर जितक्या लवकर सरकार दरबारातून मंजुरी मिळेल तितक्या लवकर ह्या रुंदीकरनाच्या कामाला गती मिळेल .

Missing link project च्या माध्यमातून घाटात होणारी वाहतूक कोंडी नाहीसी करण्याचा प्रयत्न

2002 मध्ये 94.5 km चा हा महामार्ग बनवण्यात आला होता.  त्यानंतर वाढती वाहनांची संख्या पाहता सरकारने घाटात होणारी वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी missing link project वर काम सुरु केले आहे. Missing link project च्या माध्यमातून घाटात होणारी वाहतूक कोंडी नाहीसी होईल. कारण वाहनांना पर्यायी सुविधा missing link च्या माध्यमातून मिळेल.

2026 पर्यंत पुर्ण होण्याचा अंदाज

या प्रोजेक्ट च्या माध्यमातून प्रवासाचा वेळ देखील वाचेल. त्याचबरोबर रुंदीकरनाचे काम देखील 2026 पर्यंत पुर्ण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई – पुणे प्रवास भविष्यात अधिक सुखकर होईल.