Mumbai Pune Expressway वर ‘या’ गाड्यांना No Entry; नेमकं कारण काय?

Mumbai Pune Expressway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Pune Expressway | सध्या गौरी गणपतीचे दिवस चालू आहेत. आणि मुंबई – पुण्याचे गणपती म्हंटल की लाखोंची गर्दी जमते.  ह्या ही वेळी अनेक वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक गणपती पाहायला व आता विसर्जनाला येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यातच उद्या गणेश विसर्जन आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पुंणे एक्सप्रेस वे वर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

उद्या अनंत चतुर्दशी आहे तसेच मुस्लिम बांधवांचा ईद हा सण सुद्धा उद्याच आहे. त्यामुळे या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची होणारी फजिती लक्षात घेत प्रशासनाने ह्यावर तोडगा काढण्यासाठी अवजड वाहनांना 24 तासाची बंदी घातली आहे. मुंबई शहर, नवी मुंबई आणि ठाणे येथे NH 48 म्हणजेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. मुंबई – पुणे हा एक्सप्रेसवे देशातील टॉप 10 महामार्गांपैकी एक असल्यामुळे येथे वाहतूक कोंडी होण्याची समस्या ही मोठी आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

कधीपासून वाहनांना नो एंट्री – Mumbai Pune Expressway

16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना मुंबई पुणे महामार्गावर बंदी घालण्यात आली आहे. गणपती विसर्जन उद्या म्हणजेच 28 तारखेला आहे. त्यामुळे 27 तारखेला रात्री 12 पासून ते 29 तारखेला रात्री 12 पर्यंत अवजड वाहनांना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) बंदी असणार आहे. तर पुण्यात 16 तारखेपासूनच ही बंदी लागु केली आहे. आता 28 तारखेलाही ही बंदी मोठ्या वाहनांसाठी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी तारांबळ काही प्रमाणात कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. वाहतुकीची बंदी असल्यामुळे अवजड वाहनांमधून आणला जाणारा माल व इतर महत्वाच्या गोष्टीमुळे काम थांबू नये यासाठी ह्या वाहनांना इतर पर्यायी मार्ग निवडावा लागेल.

गणपती विसर्जन आणि ईद एकाच दिवशी- 

ह्यावेळी गणपती विसर्जन आणि ईद हे दोन मोठे सण एकाचवेळी आल्याकारणाने वाहतुकीचा प्रश्न उभा राहू शकतो. लाखो नागरिक घरातून बाहेर पडतात आणि परिणामी वाहतूक कोंडली जाते. त्यामुळे एनवेळी फजिती नको हे लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.