हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली दुर्घटनेची मालिका अजूनही सुरूच आहे. आज या महामार्गावरील खंडाळा घाटात टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातात 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. या भीषण घटनेने मार्गावरील वाहतूक मात्र ठप्प झाली आहे. घटनास्थळी पोलिसानी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पुण्याहून मुंबईच्या दिशेने केमिकल घेऊन निघालेल्या टँकरचा अपघात झाल्याने टँकर रस्त्यावरच आडवा झाला. यानंतर त्यातील केमिकल खाली पडले आणि त्यातूनच टँकरला आग लागली. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केलं. या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झालं तर ३ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
Maharashtra | Four people died and three were injured when an oil tanker caught fire after it met with an accident on the Lonavala overbridge on the Mumbai-Pune expressway; Traffic movement disrupted with only one side of the highway being in use, say Pune Rural police
— ANI (@ANI) June 13, 2023
या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 5 ते गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आग भीषण असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या अपघातानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गाची केवळ एक बाजू वापरात असल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे.