हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतशी प्रवाश्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याच कारण बनलय गाड्यांची भाडेवाढ. होय ST महाडळाने भाडेवाढ केल्यामुळे इतर खासगी बसेसही भाडेवाढ करत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे. आता त्यातच मुंबई – पुणे हाही प्रवास महागला जाणार आहे. ही भाडेवाढ नेमकी किती असेल ते जाणून घेऊ.
8 नोव्हेंबर पासून सुरु झाली भाडेवाढ
8 नोव्हेंबर पासून ही भाडेवाढ लागू झाली असून ती 27 नोव्हेंबर पर्यत लागू राहील. त्यानंतर पहिले जेवढे तिकीट होते तेवढेच होणार आहे. त्यामुळे हा एक दिलासा प्रवाश्यांना मिळतोय. मात्र एन दिवाळीत ही भाडेवाढ झाल्यामुळे प्रवास करणे अनेकांना कठीण जाणार आहे. सामान्य भाड्यापेक्षा एसटीने 10 टक्के वाढ केली आहे.
पुणे – मुंबईला जाण्यासाठी मोजावे लागणार ज्यादाचे पैसे
भाडेवाढ झाल्यामुळे पुणे – मुंबई असा प्रवास करणाऱ्या नागीरकांना पैसे अधिकचे मोजावे लागणार आहेत. त्यामध्ये प्रवाश्यांना मुंबईला जाण्यासाठी व पुण्याला जाण्यासाठी असलेल्या भाड्या पेक्षा अधिकचे 45 ते 50 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना याचा मोठा धक्का बसला आहे. केवळ मुंबई – पुणेच नव्हे तर अन्य ठिकाणी सुद्धा प्रवास करताना प्रवाशांना जास्तीचे पैसे द्यावे लागत आहेत. एसटी महामंडळासोबतच शिवशाही, जलद, निमआराम, शिवाई, तसेच शिवनेरी या गाड्यांसाठी ही भाडेवाढ असणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. हे नक्की.