राजेश टोपेंचा दणका! हिंदुजा, लीलावतीसह ४ खासगी रुग्णालयांना बजावली नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना उपचारासाठी राज्य सरकारनं घालून दिलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने मुंबईतील लिलावती, जसलोक, बॉम्बे व हिंदुजा या ४ खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आहे. राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. सरकारच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. खासगी रुग्णालयांनी ८० टक्के बेड्स उपलब्ध करुन देणे आणि गरीबांसाठी १०% बेड आरक्षित ठेवण नियामानुसार अपेक्षित आहे. मात्र या आदेशाचं पालन खासगी रुग्णालयांकडून होत नाही. काल रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या रुग्णालयांना अचानक भेट दिली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रुग्णालये चार्जेसचे चार्टही लावत नसल्याचं समोर आल्याने राज्य सरकारने ही कारवाई केली आहे.

सुरुवातीला टोपेंनी बॉम्बे हॉस्पिटलला भेट दिली. तेथील बेड्सच्या उपलब्धतेबाबत जाहीर फलक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील एकूण बेड्स, ८० टक्केनुसार दिलेले बेड्स, शिल्लक बेड्स यांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांनाही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी राखीव बेड्सची माहिती दर्शविणारा तक्ता पाहिला. या भेटीमध्ये चारही रुग्णालयांमध्ये काही बाबींची पूर्तता होत नसल्याचे आढळून आल्याने या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांची क्षमता हळूहळू संपत आहे. त्यामुळे मुंबईतील खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड्स उपलब्ध करुन देण्याचे आदेश आहेत. मुंबईतील गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध झाले पाहिजेत. रुग्णालयांनी चार्जेसचा चार्ट लावला पाहिजे. रुग्णालयांना नोटीस पाठवून गरजूंना बेड्स मिळतात की नाही, आदेशांचं पालन होत आहे की नाही याची खात्री करून घेत आहेत. या रुग्णालयामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध असतील तर ते मिळालेच पाहिजेत. मी आरोग्यमंत्री या नात्याने स्वत: रुग्णालयांना भेट दिली आणि हे सहन केला जाणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तसेच रुग्णालयांनी रुग्णांना बेड्स उपलब्ध करुन दिले नाही, तर कायदेशीर कारवाई करु, असा इशाराही राजेश टोपे यांनी यावेळी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment