एकनाथ खडसेंना मोठा धक्का; पत्नीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, नेत्यांवर ईडीच्या चौकशीची टांगती तलवार आहे. अशात भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढ झाली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने आज पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने निर्णय जारी केला. दरम्यान, खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला असून त्यांच्याबाबत पुढील सुनावणी येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

आज झालेल्या सुनावणीत निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत अधिक वाद होताना दिसत आहे. एकनाथ खडसेंबरोबर त्यांच्या पत्नीलाही आता चौकशीच्या फेऱ्यात उभे केले जाणार असून न्यायालयाने आज घेतलेल्या निर्णयानुसार त्यांचावर अटक वॉरंटच जारी करण्यात आले आहे.

Leave a Comment