हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई (Mumbai) आणि कोकणाचे (Konkan) नाते सर्वज्ञात आहे. मग ते शिक्षणाच्या बाबतीतले असो किंवा नोकरीच्या. कोकण आणि मुंबई हे ह्यांची नाळ ही नोकरी, करियर, शिक्षण तसेच उत्पनाच्या स्रोताशी जोडली आहे. त्यामुळे नोकरीसाठी कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या ही अधिक जास्त आहे. परंतु कोकण आणि मुंबईला जाताना अनेकदा वाहनांचा व रस्त्याचा प्रश्न आडवा येतो. ह्यासाठी आता राज्यसरकारने एक नवीन महामार्ग जोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा अंतर्गत मुंबई सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड (Mumbai Sindhudurg Expressways) असा नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे. ज्या भागासाठी ह्याआधी दोन महामार्ग तयार केले असून हा तिसरा महामार्ग असणार आहे.
भुसंपादनास दिली शासनाने मंजुरी
मुंबई सिंधुदुर्ग कोकण ग्रीनफिल्ड ह्या महामार्गासाठी शासनाने 100 मीटर रुंद एवढी जमीन भुसंपादनासाठी दिली जाणार असून त्याबाबतचे काम लवकरच सूरु केले जाणार आहे. ह्या महामार्गाचा निर्णय 2022 मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर शासनाने आता ह्या भु संपादनास मंजुरी दिली असल्यामुळे हे काम लवकरच पूर्ण केले जाईल.
6 पदरी असेल हा महामार्ग
मुंबई सिंधुदुर्ग हा ग्रीनफिल्ड महामार्ग एकूण 6 पदरी असेल. तर त्याची लांबी 388.45 किमी एवढी असणार आहे. हे काम एकूण चार टप्यात केले जाणार आहे. हा महामार्ग मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाशी जोडला जणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांना ह्याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. नवीन होणाऱ्या महामार्गावर तुम्हाला तब्ब्ल 100 किलोमीटर वेगाने गाडी चालवता येणार आहे. तसेच हा महामार्ग रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग ह्या मुख्य जिल्ह्याना सोबत घेणार आहे. त्यामुळे येथील लोकांना आता प्रवासाबाबत कोणतीच तक्रार करायला जागा राहणार नाही हे मात्र नक्की.
प्रवाश्यांना नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घेता येणार आहे
कोकणाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला मोहून टाकते. तेच नैसर्गिक सौंदर्य सर्व नागरिकांच्या नजरेस पाडण्यासाठी व त्यांना त्याचा अनुभव देण्यासाठी हा महामार्ग कोकण किनारपट्टी जवळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.