कोल्हापूर | सतेज औंधकर
गुटख्याच्या बॅगा चोरल्याच्या संशयातून अमानुष मारहाण केल्याने मृत्यू झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील सहभागी अन्य चौघा जणांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात अली आहेत. या घटनेत दानोळी (ता. शिरोळ) येथील अर्जुन नामक तरुणाचा मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे.
टुमकूर ते अथणी या मार्गावर गुटख्याची वाहतूक आयशर कंटेनरमधून करण्यात येत होती. दरम्यान, हा गुटख्याचा कंटेनर अथणीकडे येत असताना कंटेनरमध्ये असलेल्या 144 बॅगांपैकी 53 बॅगांची चोरी झाल्याचे उघडकीस आले. ही चोरी या कंटेनरमधून गुटख्याची वाहतूक करणाऱया चांदपाशा सनाऊल्लाह व नरसिंह मूर्ती (वय 28, रा. बसवाण्णा आळी, ता. निलमंगळा, बेंगळूर) व त्यांचा मित्र अर्जुन (पूर्ण नाव समजू शकले नाही) या तिघांनी चोरल्याचा संशय इमरान अल्ताफपाशा (वय 32, रा. चिकबाणावर, बेंगळूर), अश्रफअली उस्मानअली (वय 38, सतरंजीपुरा, नागपूर) व साजिद पठाणी (मूळ रा. मुंबई, सध्या रा. अप्सरा हॉटेलजवळ, मिरज) यांना आला. त्यामुळे या गुटख्याच्या बॅगांची चौकशी करण्यासाठी तिघांनाही अथणी येथील एका गोडावूनमध्ये आणण्यात आले. त्याठिकाणी या तिघांनाही अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर इनोव्हा गाडीत घालून त्यांना मिरज येथे आणण्यात आले.
तेथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेऊन पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. गुटख्यांच्या बॅगांबद्दल चौकशी केली असता तिघांकडूनही त्याबद्दल माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे यांना पुन्हा जबर मारहाण केली गेली. या मारहाणीत महेश बजरंग दळवी (रा. दानोळी), अभिनंदन उर्फ अभ्या राजकुमार धडेल (रा. कोथळी), भरतेश सिद्राम कुडचे (रा. नदीवेश, मिरज), महंमद जुनेद अब्दुलगफार दिवाण (रा. शांतीनगर, इगतपुरी, नागपूर) व रणजित प्रकाश मिसाळ (रा. नदीवेश, मिरज) यांनी सहभाग घेतला.
सोमवारी झालेल्या या मारहाणीत अर्जुन याचा मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय या दहा जणांनी घेतला, मात्र तत्पूर्वीच या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलासंनी सर्वत्र नाकाबंदी केली आणि आरोपींना पकडण्यात ते यशस्वी झाले.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
भारतात कोरोना विषाणूचा प्रवेश?; मुंबईत दोन संशयित रुग्ण आढळले, विमानतळांवर देखरेख
पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशींना ओळखता येते – भाजप नेते कैलाश विजयवर्गीय
मशिदीवरील भोंग्यांचा त्रास आत्ताच कसा झाला?; जलील यांची राज ठाकरेंवर टिका