सातारा प्रतिनिधी। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पाचवड येथे दोन परप्रांतीय कामगारांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली आहे. रंजन मुजुमदार वय वर्ष ५५ राहणार बायकरा पश्चिम बंगाल असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या घटेनबाबत अधिक माहिती की पाचवड येथे नवीनच एक टाईल्स व फरशीचे दुकान चालू आहे. दुकानामध्ये पश्चिम बंगाल येथील २ कामगार कामास आहेत. सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हे दोन कामगार काम करत असताना त्यांचे किरकोळ कारणावरून भांडण जुंपले. त्यांचे हे वाद कमी व्हायचे तर वाढतच गेले आणि त्यातूनच एका कामगाराची हत्या झाली.
या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी शुभल देवनाल (रा. चांडपाडा, पश्चिम बंगाल) याला ताब्यात घेतले. भांडणाचे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.