नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये अशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे त्यामुळे संपूर्ण नागपूर शहर हादरले आहे. नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विधी संघर्ष बालकासह दोन आरोपींना अटक केली आहे. जितेंद्र चोपडे असे मृत तरुणाचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
जितेंद्र चोपडे हा आपल्या मित्रांसोबत त्रिमूर्ती धाब्यावर शुक्रवारी रात्री जेवण करण्यासाठी गेला होता. यानंतर जेवण करून येत असताना जितेंद्र हा गाडी चालवत होता, तर त्याचे दोन मित्र पाठीमागे बसले होते. घरी येत असतांना चंद्रकिरण नगर गल्ल मध्ये आरोपी विजय उगरेजा व रवी उगरेजा यांच्या गाडीला जितेंद्रच्या गाडीचा धक्का लागला. यावरून दोन्ही गटामध्ये मोठा वाद झाला. यावेळी आरोपी विजय उगरेजाने गाडीच्या किचनला असलेला चाकू काढून जितेंद्रच्या छातीवर वार केले. हा वाद सोडवायला गेलेल्या मित्रांवरदेखील आरोपी विजय उगरेजा याने वार केले.
या घटनेच्या सुरूवातीला आरोपी विजय उगरेजा हा एकटाच होता मात्र त्यांनी फोन करून आपल्या साथीदारांना या ठिकाणी बोलावून घेतले. सुरुवातीला यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. नंतर शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. यावेळी विजयच्या दुचाकीला चेन होती, त्याला एक छोटासा चाकू लागलेला होता, त्याचा वापर करून विजयने जितेंद्र, सौरभ व प्रकाश या तिन्ही मित्रावर हल्ला चढवला. या हल्ल्यात जितेंद्रच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे जितेंद्रच्या दोन मित्रांनी वाद सोडून त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय व त्याच्या साथीदारानने दोन मित्रावर देखील हल्ला केला.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गुन्ह्यात तीन आरोपी सहभागी असल्याचे दाखवले. मात्र या प्रकरणात तीन पाच आरोपी आहेत पोलीस त्या दोन आरोपींना पोलीस वाचवत असल्याचा आरोपी मृत जितेंद्रच्या कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे काही हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास हुडकेश्वर पोलीस करत आहे.