धक्कादायक ! उशीने तोंड दाबून पत्नीची केली हत्या; आरोपी पतीला अटक

0
90
Husband wife
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आरोग्य कॉलनीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने उशीने तोंड दाबून आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी सईबाई मोटे सामान्य रूग्णालयात पाठवला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण
आरोपी पतीचे नाव शिवाजी कैलास आढाव आहे. तो संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथील रहिवासी आहे. आरोपी पती काही दिवसांपासून आपली पत्नी संजीवनी हिच्यासोबत शेगाव येथील आरोग्य कॉलनीत भाड्याने खोली घेऊन राहत होता. आरोपी पती आणि मृत पत्नी संजीवनी यांच्यात सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असे. कालपण या दोघा पतिपत्नींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद एवढा वाढला कि आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नी संजीवनी हिच्या तोंडावर उशीने दाबून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपीने मध्यरात्रीच्या सुमारास स्वत: शहर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. यानंतर या घटनेची माहिती मृत महिलेच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

मृत महिलेच्या नातेवाईकांना शहर पोलिसांनी रात्री अडीचच्या सुमारास या घटनेची माहिती दिली त्यानंतर माहेराकडील नातेवाईक त्वरित रूग्णालयात दाखल झाले. आरोपी आणि त्यांची मुलगी संजीवनी यांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र आरोपीला दारुचे व्यसन असल्याने तो मृत मुलीला नेहमी त्रास देऊन मारहाण करायचा. याअगोदरदेखील त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेव्हा पोलिसांनी आपसात समेट घडवून आणल्यानंतर त्यांचा संसार पुन्हा सुरळीत चालू झाला होता. यानंतर काल रात्री आरोपीने रागाच्या भरात पत्नीची हत्या केली. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here