हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणाचे पडसाद आज दिल्लीसह महाराष्ट्रात उमटले. दिल्लीत जामा मशिदीबाहेर नमाज पठणानंतर नुपूर शर्मा यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच देशातील अन्य भागांतही आंदोलन करण्यात आली. तसेच निदर्शकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेची मागणी केली. सोलापुरातही एमआयएमच्यावतीने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. शर्मा आणि जिंदाल यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
भाजपाच्या प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्यावर देशभरात विविध संघटनांनी संताप व्यक्त केला जात आहे. त्याचे पडसाद आज सोलापूरमध्ये उमटले. सोलापुरात एमआयएमच्यावतीने मोठ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दींच्या नेतृत्वात हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. पनवेल आणि औरंगाबादमध्येही निदर्शने करण्यात आली. यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
जामा मशिदीपासून ते कोलकाता आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रयागराज, हावडामध्ये निदर्शकांकडून दगडफेक करण्यात आल्याचीही घटना घडली आहे. देशभरात सध्या पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेंव्यात येत आहे. तर खबरदारी घेण्याच्या सूचनाही करन्द्रिय गृहमंत्र्यालयाकडून करण्यात आल्या आहेत.
#WATCH | Maharashtra: A large number of people carry out a protest march in Solapur against the controversial remarks by suspended BJP leader Nupur Sharma. pic.twitter.com/dVpwrq0r3G
— ANI (@ANI) June 10, 2022
मुस्लिमांकडून परभणी बंदची हाक
परभणीत मुस्लिम समाज आक्रमक झाले आहेत. मुस्लिमांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली होती. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नुपूर शर्माला अटक करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.