बंगळुरू : वृत्तसंस्था – कोडागु येथील एका गावात एका सांस्कृतिक कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी बुरखा घालून डान्स (burqa dance) केला होता. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यानंतर या कार्यक्रमावर लोकांकडून टीका करण्यात आली. यामुळे आयोजकांना यासाठी माफी मागावी लागली. 28 मे आणि 29 मे रोजी पश्चिम कोलाकेरी ग्राम विकास समितीतर्फे हीरक महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांच्या 'बुरखा डान्स'मुळे मोठा गोंधळ, मुस्लीम लोकांनी डान्सवर घेतला आक्षेप pic.twitter.com/aeGazWUV2d
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 31, 2022
सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, बुरखा घातलेल्या (burqa dance) काही मुलांनी कोडवा वलगा संगीतावर नृत्य केलं आणि तेच आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मुस्लीम समुदायातून या घटनेवर तीव्र टीका करण्यात येत आहे. या टीकेनंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत या घटनेबद्दल मुस्लिम बांधवांची माफी मागितली आहे.
“कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मनोरंजनासाठी काही मुलं बुरखा घालून (burqa dance)नाचले. मात्र कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी हे आयोजन करण्यात आलं नव्हतं,” असे समितीचे अध्यक्ष के मुद्दय्या यांनी म्हटले आहे. हा डान्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हि टीका करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
नाशिकमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या
बड्डे आहे भावाचा !!! जल्लोष साऱ्या गावाचा !!!
राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा थेट फडणवीसांना इशारा
राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी कपात केली जाणार ???
आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!