हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mutual Fund Options) गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्यायांची निवड करणे फार गरजेचे असते. दरम्यान गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सामान्य माणसाला भांडवल बाजार तसेच शेअर गुंतवणीत गम्य नसल्यामुळे अशावेळी सामान्य गुंतवणूक धारकासाठी ‘म्युच्युअल फंड‘ हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र आणला जातो आणि या निधीचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड व्यवस्थापक करतात.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुमच्याकडे एसआयपी (SIP) गुंतवणूक आणि लंम्पसम (Lumpsum) गुंतवणुक असे २ पर्याय समोर असतात. त्यामुळे यातील नेमका कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी निवडावा हे आपल्याला माहित असायला हवे. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी ही बातमी जरूर वाचा.
लंम्पसम आणि SIP गुंतवणूक (Mutual Fund Options)
म्युच्युअल फंडमधील लंम्पसम गुंतवणुकीबाबत अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज लागत नाही. कारण यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या म्युच्युअल फंड योजनेत एकरकमी गुंतवणूक करता. तर एसआयपीबाबत बोलायचं झालं तर, हा म्युच्युअल फंड योजनेतील ठराविक रकमेच्या नियमित गुंतवणुकीचा मार्ग आहे. ज्यामध्ये दर महिन्याच्या एका निश्चित तारखेला तुम्हाला निश्चित रक्कम गुंतवावी लागते. अशाप्रकारे लंम्पसम गुंतवणूक आणि एसआयपी गुंतवणुकीत बराच फरक आहे. शिवाय या दोन्ही पर्यायांचे वेगवेगळे फायदे आहेत.
(Mutual Fund Options) आता जर तुम्ही लंम्पसम गुंतवणूक केली किंवा SIP मध्ये गुंतवणुक केली तरीही तुमचे पैसे हे म्युच्युअल फंड योजनेतचं जाणार आहेत. ज्यामध्ये गुंतवणुकीचे सर्व फायदे ग्राहकांना मिळतात. उदाहरणार्थ; जोखमीचे वैविध्य, व्यावसायिक व्यवस्थापन, स्केलची अर्थव्यवस्था, तज्ञ स्टॉकची निवड, बाजारात भाग घेण्याची क्षमता, उच्च आणि चांगल्या परताव्याची शक्यता इ.
लंम्पसम गुंतवणुक आणि SIP गुंतवणुकीतील फरक
जर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेतील लंम्पसम आणि SIP या दोन्ही पैकी एक पर्याय निवडण्याचा विचार करत आहेत तर त्याआधी हे जाणून घ्या की, लंम्पसम पेक्षा SIP गुंतवून ही वेगळी आहे. यातील मुख्य फरक म्हणजे गुंतवणुकीच्या पद्धती आणि वारंवारता. तथापि, यातील अनेक बारकावे असे आहेत जे समजून घेणे आवश्यक आहे. (Mutual Fund Options)
कोणत्याही लंम्पसम गुंतवणुकीत संपूर्ण रक्कम ही म्युच्युअल फंड योजनेत एकाच वेळी आणि निश्चित NAV मध्ये गुंतवली जाते. ही गुंतवणूक ज्या मार्केट लेव्हलवर केली जाते त्याचा लास्ट रिटर्न्सवर परिणाम होऊ शकतो. तर SIP गुंतवणूक मार्केट लेव्हलसाठी उदासीन असते. कारण SIP हप्त्यावर तुमचे नियंत्रण नसते. तो ठराविक तारखेनुसार निश्चित योगदान भूमिकेवर आधारित कालावधीत असतो. (Mutual Fund Options) त्यामुळे एसआयपी म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा मार्केट टाईमसोबत कोणताही संबंध नसतो.
लंम्पसम पेक्षा SIP वेगळे
SBI सिक्युरिटीजनुसार, लंम्पसम गुंतवणुकीपेक्षा SIP म्युच्युअल फंड फार वेगळे आहे हे सिद्ध करणारे दोन महत्वाचे घटक आहेत. एक म्हणजे, SIP ही एकरकमी गुंतवणुकीच्या विरूद्ध विचार केला असता लोकांना मासिक बचत करण्याची सवय लावते. कारण SIP गुंतवणुकीत सरासरी खर्च आणि चक्रवाढ दीर्घकाळ संपत्ती निर्मितीचा आधार बनतो. (Mutual Fund Options)
तसेच दुसरा घटक म्हणजे, बहुतेक लोक वेळोवेळी पगार किंवा कमिशनसारखे उत्पन्न मिळवतात. म्हणून हे तार्किक आहे की SIP बहिर्वाह उत्पन्नाच्या प्रवाहाशी समक्रमित आहे. परिणामी गुंतवणूकदारांना SIP म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे सोपे आणि सोयीचे वाटते.
लंम्पसम आणि SIP चे वेगवेगळे फायदे- तोटे
जर तुम्ही लंम्पसम फंडात गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बाजारातील परिस्थिती पाहून तुम्ही गुंतवणूक करू शकता. (Mutual Fund Options) ज्यामुळे तुम्हाला अल्पावधीत नफा मिळेल. मात्र लंम्पसम फंदात गुंतवणूक केल्यास तुम्हाला टाईमफ्रेमचा फायदा मिळत नाही. याचा परिणाम तुमच्या रिटर्न्सवर होतो.
तसेच तुम्ही SIP फंदात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे बाजारातील सर्व टाईमफ्रेमचा फायदा मिळतो. शिवाय SIP ईएमआय सारखी असते. त्यामुळे दीर्घकालीन चक्रवाढीचा फायदा होतो. अशावेळी SIP मूळे होणार तोटा लक्षात घ्यायचा झाला तर, SIP निश्चित तारखेनुसार असते. त्यामुळे विलंब झाल्यास दंड भरावा लागतो.
गुंतवणुकीसाठी उत्तम काय?
आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे आहे मात्र लंम्पसम की SIP याबाबत जर कन्फ्युज असाल तर काळजी करू नका. नेमकी कशात गुंतवणूक करावी यासाठी म्युच्युअल फंडाचे कोणतेही कठोर नियम नाहीत. (Mutual Fund Options) त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी तुमचा राहील. आता लंम्पसम आणि SIP गुंतवणुकी दरम्यान निर्णय घेताना सगळ्यात आधी काही महत्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. यात गुंतवणुक करण्यायोग्य अधिशेषाची उपलब्धता हा महत्वाचा घटक आहे.
जर तुमच्या उत्पन्नाचा प्रवाह नियतकालिक आणि स्थिर असेल तर तुम्ही डोळे झाकून SIP मध्ये गुंतवणूक करा. मात्र जर तुमची गुंतवणूक करण्यायोग्य अतिरिक्त रक्कम अनियमित असेल तर तुम्ही लंम्पसम गुंतवणूक निवडू शकता. मुख्य म्हणजे, दोन्ही पर्यायांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे दोन्ही पर्यायांची तुलना करू नका. आवश्यक त्या घटकांचा विचार करा योग्य पर्यायासोबत गुंतवणूक करा. (Mutual Fund Options)