संभाजीराजेंना महाविकास आघाडी राज्यसभेवर पाठवणार?? शरद पवारांचं सूचक विधान

sharad pawar sambhaji raje
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती संभाजी राजे यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आला आहे. त्यानंतर आपली पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करू अस संभाजी राजे यांनी म्हंटल होत. त्यातच आता संभाजीराजे याना महाविकास आघाडी राज्यसभेत पाठवेल अशा चर्चा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे.

शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांना संभाजी राजेंना महाविकास आघाडीच्या ऑफर बाबत विचारण्यात आले. यावेळी पवार म्हणाले, अशी कोणतीही चर्चा झाली नसली तरी मी स्वतः राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत महाराष्ट्राचे काही प्रश्न आले तर आम्ही स्वत:चा पक्ष बाजूला ठेवून एकत्र यावं, असं आवाहन करत होतो. तेव्हा आम्हाला संभाजीराजेंचं नेहमीच सहकार्य लाभलं आहे अस म्हणत संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं पवार म्हणाले.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारले असता पवार म्हणाले, या निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या, याबाबत अद्याप महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत आमची चर्चा झालेली नाही. मात्र आम्ही याबाबत पक्षांतर्गत बैठक घेतली असता या बैठकीत वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत. सर्वांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र बसावं, असं काही लोकांचं म्हणणं आहे, तर काही लोकांनी मागणी केली आहे की सरकारमध्ये आपण एकत्र असल्याने ही निवडणूकही महाविकास आघाडी म्हणूनच लढवावी.