हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सातत्याने हे सरकार लवकरच पडेल अशा वल्गना भाजप नेत्यांकडून केल्या जात आहेत. मात्र आता महाविकास आघाडीचे शिल्पकारच असलेल्या शरद पवारांनी भाजप नेत्यांच्या या दाव्याला आव्हान देत हे सरकार पूर्ण 5 वर्ष चालणार असल्याचे म्हणत ठणकावले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली.
शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य चालावे, असे तिन्ही पक्षांना वाटते. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जुळवून घेतले आहे आणि त्यानुसार पुढे जाण्याचे आमचे ठरले आहे. त्यामुळे सरकार आज जाईल, उद्या जाईल अशा पहिल्या दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चा पुढचे पाच वर्षे अशाच सुरू राहणार आहेत, त्यांनी फक्त दिवस मोजावेत असा टोलाही पवार यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला
दरम्यान, केंद्रात मोदींना सक्षम चेहरा विरोधकांकडे नाही का असा सवाल पत्रकारांनी केला असता हा चेंडूही पवारांनी चांगक्या रीतीने टोलवला. 1975 ते 1977 या आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींविरोधातही देशात सक्षम नेता कोणी नव्हता. पण निवडणुका पार पडल्यानंतर संपुर्ण देश त्यांच्या मागे उभा राहिला आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यामुळे मोदींना पर्याय नाही अस म्हणता येत नाही असे पवारांनी सांगितले.