दिवाळी विशेष । प्रविण राजेंद्र कोळपे
थोड्याच दिवसांनी दिवाळी येत आहे. या दिवाळीच्या सुट्टीत नेमक काय करायच हे प्रश्न अनेकांना पडत असतात कारण वाढत्या बदलांमुळे माणूस हा शहराकडे वळू लागला. आणि गावाकडच्या सणांची असलेली बांधिलकी विसरू लागल्याने गावाकडचे गावपण हे संपुष्टात येत आहे. माझ्या गावाकडे दिवाळीमध्ये दरवर्षी दिवाळीच्या अगोदर आठ दिवस प्रत्येकाच्या घरातून वेगवेगळ्या पर्दाथांचा सुंदर असा वास यायचा आज करंजी उद्या चकली परवा लाडू, चिवडा… माझ्या ही घरात आईला दिवाळीत शंकरपाळीचे किंवा करंजीचे पिठ मळून देत असे काहीnचुकायचे पण भारी वाटायच… आईच शिव्या देणं, पदार्थ बनवायचे सुरू असतानाच मध्येच हात घालून चव बसायच…आई बोलायची थांबरे थोडावेळ दमच नाही कसला पण हासून खेळून तीचे बोलणे टाळायचे.
यांबरोबर घरासमोर महाराष्ट् राज्याची विजयाची साक्ष देणारे किल्ले त्यांची प्रतीकृती दिवाळीमध्ये दरवर्षी मी माझ्या गावात अनेकजण करत असतात शेतातून माती आणुन दगडांचा आधार घेवून अभिमान वाटेल असा छत्रपतींचा किल्ला साकारायला खूप आनंद भेटायचा. किल्ला तयार झाल्यावर दिवाळी दिवशी पहाटे उठून आईच्या हाताने उठण्याने खसा खसा चोळलेल अंग गरम पाण्यानं लालबुंद व्हायचे काही बोलले की आजी म्हणायची गप्प बस पहिली आंगोळ आहे. अंगोळ करायची अन बाबांनी आनलेली सुंदर अशी हातातून बाहेर येणारा शर्ट कंबरेतून खाली येणारी पँट परिधान करायची आणि छ.शिवाजी महाराजांची मुर्ती सर्व मावळ्यांची चित्रे किल्यावरती उभे करायची. सुंदर अशी रांगोळी काढून घरी आईने तयार केलेली पनती लावून घरातील देव पैसे गाडी साधने यांचे पूजन करून थोडीफार फटाक्यांची आताशबाजी करत असे जेणेकरून इतरांनाही व पर्यावरणाला त्रास न होता दिवाळीचा दिवस हा खुप सुंदर व चैतन्यमय होत असे.
पण या बदलत्या युगात ग्रामीण भागातील लोक शहरात स्थलांतरीत होत असल्याने अनेक सण हे शहरीभागात होत नसतात. अनेक गोष्टी आयत्या बाजारात मिळत आहेत. त्याचा अनेकजन वापर करत आहेत. काही गोष्टींपासून लोक ही नोकरी अभावी जागे अभावी शहरात वाढत्या महागाईने सणांपासून दूर ओढला जात आहे. यांमुळे मराठी संस्कृती येणार्या काळात कुठेतरी संपुष्टात येण्याचा धोका निर्माण होवू शकतो.
हे लक्षात घेतले पाहिजे की जर आपले स्वामी विवेकानंदजी किंवा भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यांनी आपल्या संस्कृतीचा झेंडा जागतिक पातळीवर झळाळून सोडला. म्हणून आपणही कोठे जरी असलो तरी आपल्या संस्कृतीची नाळ आपण विसरता कामा नये. आपली संस्कृती आपली ओळख सांगत असते. आणि आपली संस्कृती ही देशाची ओळख सांगत असते. यामुळे संस्कृती प्रमाणे प्रत्येक सण हे आंनदाने उत्साहाने साजरे करणे गरजेच आहे.
(लेखक यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स साताराचे विद्यार्थी असून विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाला शिकत आहेत)